Home वर्धा 15 ऑगस्ट अमृत महोत्सवच्या नावावर तहसील कार्यालयीन कामे 3 नंतर जनतेला मानसिक,...

15 ऑगस्ट अमृत महोत्सवच्या नावावर तहसील कार्यालयीन कामे 3 नंतर जनतेला मानसिक, शारीरिक ,आर्थिक त्रास

294

 

समुद्रपूर :- 17 ऑगस्ट
तहसील कार्यालय यांच्याकडून 15 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला अशी माहिती मिळाली त्यामुळे हा कार्यक्रम 17 ऑगस्ट रोज बुधवार ला घेण्यात आला . परंतु समुद्रपूर तहसील कार्यालय याला अपवाद ठरली या ठिकाणी बाहेर येणाऱ्यांना तहसील मधील कामासाठी तीन वाजेपर्यंत वाट पाहायला लागली यासाठी समुद्रपूर तहसील कार्यालयाला वेगळा आदेश होता का ?
तहसीलदार राजू गणवीर :- तहसील ऑफिस बंद नाही ऑफिसमध्ये आझादी महोत्सव कार्यक्रम असल्यामुळे दोन-तीन वाजता ऑफिस सुरू होईल.
शासन परिपत्रक :
“समूह राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० व स्वराज्य महोत्सव” अंतर्गत “समुह राष्ट्रगीत गायन” या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह
राष्ट्रगीत गायन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असेल.
३. सकाळी ठीक ११:०० वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११:०० ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

Previous articleसरपंचाची निवड जनतेतूनच :- सभागृहात विधेयक मंजूर
Next articleरायसोनी ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कडून फसवणूक केल्याचा आरोप ? चौकशीची मागणी