Home Breaking News समुद्रपूर येथे अनेक वर्षापासून 100 रुपयांच्या स्टॅम्प ११० रुपयात शासन प्रशासन व...

समुद्रपूर येथे अनेक वर्षापासून 100 रुपयांच्या स्टॅम्प ११० रुपयात शासन प्रशासन व इतरांचे दुर्लक्ष

970

 

सचिन वाघे प्रतिनिधी

समुद्रपूर :-जोशना अनिल कामडी यांचे अनेक वर्षापासून इंडियन गॅस एजन्सी येथे स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी जोशना कामडी या स्वतः स्टॅम्प खतवत नसून इतर कोणीच दुसरा व्यक्ती स्टॅम्प खतवतात व येथील सर्वांना हे खुलेआम दिसत आहे तरीसुद्धा येथील शासन प्रशासन व इतरांचे दुर्लक्ष. आज सर्व ठिकाणी खुलेआम भ्रष्टाचार वाढत आहे कोणतीही कारवाई होत नाही . व हे सर्व अनेक वर्षापासून सुरू आहे समुद्रपूर तहसील कार्यालय ,दिवाणी न्यायालय येथे सरकारी कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते जोशना कामडी या ठिकाणी शंभर रुपयाचा स्टॅम्प 110 रुपयांमध्ये विकतात . 110 रुपये घेतल्यानंतरच स्टॅम्प पेपर देण्यात येते . आपण हिंगणघाट तहसील कार्यालय येथे 100 रुपयात स्टॅम्प मग इथे 110 रुपये का ? स्टॅम्प घेणाऱ्याने असे विचारल्यास त्याला सांगण्यात येते की स्टॅम्प घेण्याच्या अगोदरच 110 रुपये सांगितले होते. पटलं तर घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं बाहेर गाऊन येणाऱ्यांना मजबुरीने शंभर रुपयाची स्टॅम्प 110 रुपये द्यावे लागते . समुद्रपूर येथील शासन प्रशासनाचे डोळे बंद आहे. हेच लक्षात येते याबद्दल अनेक तक्रारी पेपरच्या माध्यमातून प्रशासनास माहिती असताना सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही. याचं आश्चर्य होत आहे.

Previous articleचितोडा येथील एका व्यक्तिचा अत्यंत निघृणपणे खून पोलीस यंत्रणा दाखल परिसरात एकच खळबळ
Next articleआमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कडून समुद्रपूर च्या पुरग्रस्तांना किराणा किट चे वाटप