Home अकोला वाडेगाव तंटामुक्त अध्यक्षपदी मो.अफ्तार यांची निवड

वाडेगाव तंटामुक्त अध्यक्षपदी मो.अफ्तार यांची निवड

309

 

संतोष काळे बाळापुर

वाडेगांव ग्राम पंचायतची ग्रामसभा श्री जागेश्वर मंदीराच्या सभागृह मध्ये नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये सर्वांनुमते वाडेगाव तंटामुक्त अध्यक्षपदी मोहम्मद अफ्तार यांची एक मताने निवड करण्यात आली

यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष अँड सुबोध डोंगरे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच मेजर मंगेश तायडे उपस्थीत होते. ग्रामविकास अधिकारी सुनिल इंगळे यांनी मागील सभेचे इतीवृत्त वाचुन दाखविले तसेच शासन परिपत्रकाचे ,माहीती अधिकार अर्जाचे वाचन केले आणि शासनाच्या विविध योजने बद्दल माहीती देवुन अजेंड्या वरील सर्व विषय वाचवून दाखविले तसेच वेळेवर आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.अजेंडयावरील व वेळेवर आलेल्या सर्व विषयायांना ग्रामसभेत सर्व ठराव मंजुर करण्यात आले.यावेळी तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यासाठी ग्राम सभेत विषय घेण्यात आला असता वाडेगाव तंटामुक्ती अध्यक्षस्थपदी हाजी मो.अफ्तार ऊर्फ बब्बु भाई ठेकेदार यांची मतदान फ्ध्दतीने हात वर करून बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायतचे सर्व सदस्यगन गावातील नागरिक,पत्रकार बाधव तसेच ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थीत होते. वाडेगाव पोलिस चौकीचे उपनिरीक्षक गजानन राहटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous articleआमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कडून समुद्रपूर च्या पुरग्रस्तांना किराणा किट चे वाटप
Next articleआता यापुढे राज्यातील या नागरीकांना मिळणार नाही रेशनधान्य