Home Breaking News आता यापुढे राज्यातील या नागरीकांना मिळणार नाही रेशनधान्य

आता यापुढे राज्यातील या नागरीकांना मिळणार नाही रेशनधान्य

1546

 

राज्य सरकारचा मोठा निर्णय

संतोष काळे बाळापूर

आता राज्यातील ज्या नागरिकांचे उत्पन्न वाढले आहे अश्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातुन मिळणार रेशनधान्य मिळणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारकडुन १ सप्टेंबर पासुन रेशनकार्डाची पडताळणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक नागरिकांना रेशनधान्यापासुन मुकावे लागणार आहे .

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की राज्यातील ज्या नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे ,असे नागरिक देखिल स्वस्त किंमतील रेशनधान्याचा लाभ घेत आहेत. अश्या नागरिकांकडुन सदर रेशनधान्य जास्त किंमतीत विकण्यात येते. तसेच असे रेशनधान्य जनावरांसाठी भरडा म्हणुन वापर होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे .यामुळे राज्यातील ज्या नागरिकांना खरच रास्त किंमतीत रेशनधान्याची आवश्यकता आहे अश्या नागरिकांपर्यंत रेशनधान्य मिळत नाही . शिवाय दारिद्रय रेषेखालील कार्ड धारकांना विशेष सवलत दरांमध्ये,रेशनधान्य दिले जाते . परंतु जे नागरिक खरच दारिद्रय रेषा खाली आहेत.अश्या नागरिकांकडे दारिद्रय रेषेचे कार्ड नसल्याची बाब समोर आली आहे .उत्पन्न वाढुन देखिल नागरिक रास्त भावामध्ये रेशनधान्य घेवून,जास्त किंमतीमध्ये धान्य विकत असल्याने अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.यासाठी ज्या नागरिकांचे उत्पन्‍न वाढुनही रास्त भावामध्ये रेशनधान्याचा लाभ घेत असतील अश्या नागरिकांचे रेशनकार्डाची पडताळणी दि १ सप्टेंबरपासुन सुरु होणार आहे .

Previous articleवाडेगाव तंटामुक्त अध्यक्षपदी मो.अफ्तार यांची निवड
Next articleसंग्रामपूर शहराच्या मध्यभागी व भरवस्तीत असलेले देशी दारू दुकान हटवन्यात यावे – सौरभ बावस्कार