Home Breaking News वाडेगाव येथे अपघात:- एक गंभीर

वाडेगाव येथे अपघात:- एक गंभीर

1200

 

बाळापुर पातुर महामार्गावरील वाडेगाव पोलीस चौकी समोर छोटा हत्तीने एकास धडक दिल्याने ४५ वर्षीय नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली

बाळापुर पातुर महामार्गावरील वाडेगाव पोलीस चौकी समोर एम पी १३ एच १२५९ क्रमांकाच्या ट्रकने एम एच ३० बि डी ४८३० क्रमांकाच्या छोट्या हत्तीला धडक दिली त्या छोट्या हत्तीने रस्त्याच्या कडेला बसलेल्या कन्हैया तोताराम परसैया वय ४५ वर्ष यांना धडक दिली या अपघातात कन्हैया परसैया हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, पोलीस काॅस्टेबल गणेश गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.

 

Previous articleसंग्रामपूर शहराच्या मध्यभागी व भरवस्तीत असलेले देशी दारू दुकान हटवन्यात यावे – सौरभ बावस्कार
Next articleविरोधी पक्ष नेता माननीय अजितदादा पवार यांचे अमरावतीत जंगी स्वागत