Home Breaking News यावल येथे लंपी स्किन डिसीज या गुरांच्या संसर्गजन्य गंभीर आजारावर उपाययोजना व्हावी...

यावल येथे लंपी स्किन डिसीज या गुरांच्या संसर्गजन्य गंभीर आजारावर उपाययोजना व्हावी यासाठी बैठक संपन्न

452

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात मागील काही दिवसापासुन गुरांवर लंपी स्किन डिसीज हा गंभीर स्वरूपाचा संसर्गजन्य आजार लागला असुन तो वेगाने पसरत असल्याने या मुळे शेतकरी बांधवांची अनेक मोल्यवान गुरेढोरे दगावली जात असल्याच्या पार्श्वभुमीवर शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी यासाठी पंचायत समितीच्या पशुधन विभागाच्या माध्यमातुन सरपंच व ग्रामसेवक यांची तातडी ची बैठक आयोजीत करण्यात आली होती . यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात यावलचे तहसीलदार मेहश पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरेढोरांच्या लंपी या धोकादायक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती , बैठकीत तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातीत ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी बांधवांना या आजारापासुन अधिक सर्तक व सावधान राहण्याच्या सुचना दिल्या असुन , येणारा पोळा हा सण आपणास अगदी साद्या पद्धतीने साजरा करायचा आहे . सर्व ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातील गुरढोर यांचे पंचायतीच्या पातळीवर प्रशासनाच्या माध्यमातुन १०० % टक्के लसीकरण करणे हे अत्यंत गरजे आहे . या गुरांवर आलेल्या कोरोना सारख्या संसर्गजन्य धोकादायक लंपी स्किन डिसीज हा आजार खुप मोठया प्रमाणात तालुक्यात व जिल्ह्यात वेगाने वाढत असुन यामुळे शेकडो गुरठोर दगावली जात आहे या गंभीर समस्यामुळे शेतकरी बांधव मोठया संकटात ओढवला गेला असुन या आजारास पुर्णपणे संपाविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची गरज असल्याने यासाठी यावल पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार महेश पवार , सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे , यावलचे पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. एस एन .बढे यांच्यासह बैठकीस तालुक्यात सरपंच , ग्रामसेवक उपस्थित होते .

Previous articleआ.समिरभाऊ कुणावार यांनी पुरबाधितांसाठी केली भरघोस मदतीची मागणी…आ.कुणावार यांचा सभागृहात एल्गार..
Next articleठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….