Home Breaking News शिक्षक सन्मान अभियान प्रणित विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली द्वारा शिक्षक व...

शिक्षक सन्मान अभियान प्रणित विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली द्वारा शिक्षक व समाज दत्तक योजनेला उत्तम प्रतिसाद.

788

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-आज दिनांक:२४ आगष्ट २०२२ ला ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान’ प्रणित विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली द्वारे “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजना” अंतर्गत अभियानाचे राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर यांनी निवड केलेल्या “सम्राट सतिश हिचामी” या विद्यार्थ्यास निवडपत्र,पालक माहितीपत्र व पुस्तक भेट देऊन विद्यार्थी निवड प्रक्रियेचा गडचिरोली जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी बापु भोयर राज्य कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे गडचिरोली जिल्हा प्रमुख बिदुर अधिकारी,विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली सुरेश उसेंडी,जिल्हा सचिव विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली, किशोर हिचामी,अध्यक्ष , शालेय व्यवस्थापन समिती , दर्पणगुडा, सौ.सपना झाडे, सदस्य ग्रामपंचायत वरूर, मुख्याध्यापक भिमा गुजेलवार दर्पणगुडा व गावकरी मोठ्या संख्येने पालक,गावातील नागरिक उपस्थित होते.
गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक सहाय्य केल्या जाणार आहे.राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर,राज्य समन्वयक चांगदेव सोरते व इतर सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Previous articleजय बजरंग कनिष्ठ कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बदललं मागदर्शन
Next articleहिंगणघाट नगरपरिषदेने मोकाट जनावरांसाठी केली कोंडवाडाची व्यवस्था