Home Breaking News हिंगणघाट भूमि अभिलेख मध्ये कर्मचारी करतात भ्रष्टाचार वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

हिंगणघाट भूमि अभिलेख मध्ये कर्मचारी करतात भ्रष्टाचार वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

575

 

सचिन वाघे ( प्रतिनिधी)

हिंगणघाट :— पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जेवढी आतुरता होती त्या आतुरते च्या अनुषंगाने हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी ऐन पावसाळ्यात पाऊस असताना सुद्धा शेतकऱ्यांचे हित जोपासून त्यांच्या शेताची दिलेल्या आदेशानुसार मोजणी केलेली आहे वास्तविक रित्या सकाळी 8 पासून बारा एक वाजेपर्यंत पावसाची संतत धार असते या दरम्यान शेतकऱ्यांचे येणाऱ्या फोनद्वारे त्यांना प्रतिसाद देत त्यांच्या शेतामध्ये पोहोचून त्यांच्या शेताची सुरळीतपणे व योग्य पद्धतीने मोजणी करून दिल्या जात असते मोजणी हिंगणघाट पासून काही अंतरावर असलेल्या सावली वाघ,शेकापूर, मनसावळी,वडनेर,व अन्य येथे करण्यात आलेली आहे त्याअनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मागील बऱ्याच दिवसांपासून सतत एक सारख्या शेतीच्या मोजणी करत आहे एवढेच नव्हे तर शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असून सुद्धा या दिवसांमध्ये त्यांनी भुमिअभिलेख मध्ये असलेल्या पेंडिंग केसेस हाताळण्याचे कार्य सहज आणि सुरळीतपणे सहकाऱ्याला घेऊन केलेले आहे मागील दोन-तीन महिन्यांपासून शेती मोजनीच्या नोंदी झाल्यामुळे आणि मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे या मोजण्या निकाली काढलेल्या आहे परिसरातील बरेच मोजण्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या द्वारे करण्यात आलेला आहे . तसेच हिंगणघाट येथील पुरपीडित पट्ट्या मध्ये वारस नोंद चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत आहे मोबदल्यात त चिरी मेरी मोठ्या प्रमाणात होत आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील TLR श्री प्रसन्न भुजाडे यांच्या मार्गदर्शनात बऱ्याचशा पेंडींग प्रकरण निकाली काढलेले आहे.
परंतू भूमी अभिलेख कार्यालयातील नजूल व लीज च्या प्रकरणाबाबत नोंदी केलेले प्रकरण, निकाली निघालेले प्रकरण तसेच पेडिंग असलेल्या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केल्या जात आहे याकडे Deputy Director-भूमी अभिलेख नागपूर, SLR श्री प्रमोद ठुबे -Wardha,या वरीष्ठ अधिकार्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. येथील TLR श्री प्रसन्न भुजाडे हे पूरपीडीत पट्टे, नजूल , लीज चे प्रकरण हाताळणा-या कर्मचाऱ्यावर विशेष प्रसन्न दिसून येत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Previous articleहिंगणघाट नगरपरिषदेने मोकाट जनावरांसाठी केली कोंडवाडाची व्यवस्था
Next articleप्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्व रुचित वांढरे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण.