श्याम उमरकार संग्रामपुर
संग्रामपूर तालुका शिवारातील सिलिंगची शेतीचा वर्ग बदलून अदलाबदली करावी या कारणावरून चक्क त्याची रजिस्टर खरेदीने विक्री करून शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी ,शेती विक्री करणारे आणि खरेदी करून घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा .आणि सदर शेती शासन जमा करावी. अशा प्रकारची तक्रार शेख सईद शेख कदिर रा .जामोद यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की मौजे संग्रामपूर तालुक्यातील गट क्रमांक 148 क्षेत्र 1.80 हेक्टर आर शेती भोगवटदार वर्ग 2 असून सदर शेती ही गुंफाबाई समाधान इंगळे यांची असून ती शिलींगची आहे, तसेच मौजे निरोड ता. संग्रामपूर येथील गट क्र.2 क्षेत्र 0.95 हेक्टर शेती व वर्ग 1ची असून ती रामचंद्र गणपत इंगळे यांच्या मालकीची होती. सदर शेतीची अदलाबदली करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कायद्यातील तरतुदी करून दोन्ही शेतकऱ्यांनी संयुक्त कर्ज केला होता, त्यानुसार उपविभागीय अधिकारी जळगाव जा. यांनी रा.प्र.क्र./ सिलिंग/ संग्रामपूर /4/ 2004-05 या प्रकरणी दि .30 /5 /2005 रोजी आदेश देऊन मौजे संग्रामपूर तालुक्यातील गट नंबर 148 शेत्र एक हेक्टर 80 आर वर्ग दोनची शेती रामचंद्र गणपत इंगळे यांनी घ्यावी व मौजे निरोळ ता संग्रामपूर येथील गट नंबर 2 क्षेत्र 0.95 हेक्टर आर शेती ही गुंफाबाई समाधान इंगळे यांनी घ्यावी असे असताना वरील शेतीची रजि. दस्त.1204/2005 रोजी अदलाबदली करण्यात आली. व तशी नोंद सातबारा उतारावर करून घेतली. परंतु शेतीची अदलाबदली केल्यानंतर सदर शेतीचा भोगवटदार वर्ग दोन हाच असावयास पाहिजे होता .परंतु तलाठी, मंडळ अधिकारी व रामचंद्र गणपत इंगळे यांनी शासनाची दिशाभूल करून व संगनमत करून वर्ग 2 हा वर्ग 1 मध्ये पदावर्तित केला. आणि बनावट दस्ते ऐवज तयार करून भूमी स्वामी केले. सदर गट नंबर 148 क्षेत्र एक हेक्टर ८० आर सालीम शेती ही लक्ष्मी गिरीश अग्रवाल यांना रजिस्टर क्रमांक 1791/2016 अन्वये विक्री केलेली आहे. त्यामुळे बनावट दस्तऐवज व सिलिंगची शेतीची विक्री केल्या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी ,शेती विक्री व खरेदी करणारे तसेचसंबधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि शेती कायद्यातील शर्ती व अटीचा भंग केल्या कारणाने ही शेती शासन जमा करण्यात यावी. अशी तक्रारीतून शेख सईद शेख कदीर रा.जामोद यांनी मागणी केली आहे.