Home जळगाव यावल सातपुडा जंगलातील पायझीरी पाडा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल वन अधिकारी कार्यरत...

यावल सातपुडा जंगलातील पायझीरी पाडा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल वन अधिकारी कार्यरत असताना झालीच कशी : मनसेची वनमंत्रीकडे तक्रार

423

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा जंगलातील मोल्पवान शेकडो सागवानच्या वृक्षांची कतल करू शेती करू पाहणाऱ्यांवर वनविभागाने केलेली कार्यवाही ही योग्यच आहे पण त्या क्षेत्रातील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची दुर्लक्ष व दिरंगाई दिसुन येत नाही का मग वन विभागाने या ठीकाणी कार्यरत असलेल्या अकार्यक्षम वन कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कार्यवाही व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहित विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढककर यांनी वनमंत्री सुधिर मुंगंटीवार यांच्याकडे पत्र पाठवुन केती आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की यावल तालुक्यातील सातपुडा जंगलातील डोंगर कठोरा पायझीरी पाडा या राखीव वन खंड कंपार्टमेंट क्रमांक७९ / ८०या क्षेत्रात मागील काही दिवसापासुन मोल्यवान सागवानच्या शेकडो वृक्षांची बेकायद्याशीर तोड करण्यात आली , यासंदर्भात वनविभागाने वृक्षतोड करणाऱ्यांवर केतेली कार्यवाही योग्य आहे परन्तु या क्षेत्रात वनविभागाच्या शासकीय सेवेत असलेल्या वनपाल , वनरक्षक , वनमजुर हे या वन क्षेत्रात कार्यरत असतांना एवढया मोठया प्रमाणावर ही वृक्षतोड झालीच कशी याबाबत संशय निर्माण होत असून , वन विभागाने वरिष्ठ पातळीवर या सर्व प्रकाराची तात्काळ चौकशी करून या घटनेत वृक्षतोडीला थांबविण्यात अकार्यक्षम असलेल्या संबधीतांवर वाघझीरा पश्चिम क्षेत्रात झालेल्या कार्यवाही प्रमाणे संबधीतांवर निलंबनाची कार्यवाही करावी याबाबत ची तक्रार राज्याचे वनमंत्री सुधीर मुंगंटीवार यांच्याकडे पाठविण्यात आले असुन , या संदर्भात अशा प्रकारे सातपुडा जंगलाचा नायनाट करणाऱ्यांवर कार्यवाही न झाल्यास आपण मनसे स्टाईल आंदोलन करू असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिला आहे . या संदर्भात वरीष्ठ पातळीवर देखील माहीती देण्यात येत आहे .

Previous articleमारोती / कोचर वार्ड पोळ्याच्या निमित्य बैलाच्या सजावट व दहि हांन्डि तान्हा पोळा चे निमित्याने लहान मुला मुलिना वेशभुषा स्पर्धेत बक्षित वितरीत
Next articleमल्हारी पेट्रोल पंप येथे पेट्रोल ग्राहकाची फसवणूक