Home वर्धा मल्हारी पेट्रोल पंप येथे पेट्रोल ग्राहकाची फसवणूक

मल्हारी पेट्रोल पंप येथे पेट्रोल ग्राहकाची फसवणूक

811

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :-मल्हारी पेट्रोल पंप (नंदोरी चौक) येथे 106.55 रुपये प्रति लिटर तर पावर पेट्रोल112.92 रुपये प्रति लिटर या भावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु अनेकदा या ठिकाणी 106 . 55 रुपये प्रति लिटर पेट्रोल संपले सांगण्यात येते त्याऐवजी 112 .92 रुपये प्रति लिटर पावर पेट्रोल विकण्यात येते . याची कल्पना ग्राहकांना नसते. पेट्रोल पंपवर पावर पेट्रोल उपलब्ध आहे याबद्दल या ठिकाणी कोणतीही माहिती असलेला सूचना फलक लावण्यात आलेला नाही . एक प्रकारे पेट्रोल ग्राहकाची पेट्रोल पंप मालकाकडून फसवणूक होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Previous articleयावल सातपुडा जंगलातील पायझीरी पाडा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल वन अधिकारी कार्यरत असताना झालीच कशी : मनसेची वनमंत्रीकडे तक्रार
Next articleगणपती उत्सवा दरम्यान दारूचे दुकाने बंद ठेवा