संग्रामपूर तालुका शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गौरी पूजन व गणपती उत्सवा दरम्यान दारूचे दुकान बंद ठेवण्यात यावी याकरिता संग्रामपूर तालुका शिवसेना व संग्रामपूर शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना 30 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सध्या गौरी पूजन व गणपती उत्सवाच्या सणाला सुरुवात होत असून घराघरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा होत असतो तर सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये पुरुष ,महीला,लहान मुले, वृद्ध व्यक्ती आवर्जून उपस्थित असतात त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहणे अत्यंत गरजेचे आहे परंतु काही दारू विक्रेते उत्सवाचा गैरफायदा घेऊन सर्रास दारू विक्री करत असतात त्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होते त्यामुळे या उत्सवा दरम्यान दारूचे दुकाने बंद ठेवण्यात यावी जेणेकरून सण उत्सवाचे पावित्र्य कायम राहील व व्यसनाला सुद्धा आळा बसेल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे तसेच गणपती उत्सवाच्या काळात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये तसेच विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे बाबत कार्यकारी अभियंता यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर कैलास कडाळे पाटील तालुका उपप्रमुख, शुभम गजानन घाटे शहर प्रमुख, धनंजय देशमुख उमेश राजनकार, भैय्या पाटील, अमोल ठाकरे, प्रशांत इंगळे ज्ञानेश्वर गोतमारे आदींच्या या निवेदनावर आहेत
तहसीलदार यांना निवेदन देताना संग्रामपूर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते