Home वर्धा नगरपरिषद हद्दितील बिना परवानगी झाडे / वृक्ष तोडल्यास होणार कारवाई!

नगरपरिषद हद्दितील बिना परवानगी झाडे / वृक्ष तोडल्यास होणार कारवाई!

381

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट नगर परिषद हद्दितील झाडे / वृक्ष धोकादायक स्थितीत असल्यास किंवा धोकादायक झाडाच्या फांदया तोडावयाच्या असल्यास नागरीकांनी तसा रितसर अर्ज / झाडांचा फोटो सह नगर परिषद कार्यालयात सादर करावा. आपण सादर केलेला अर्ज महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये हिंगणघाट नगर परिषदेमध्ये नियुक्त वृक्ष प्राधिकरण समितीची सभेसमोर ठेवण्यात येईल. वृक्ष प्राधिकरण समितीच्या मान्यतेनंतर त्वरीत निर्णय घेवुन निकाली काढणे तसेच अवैध वृक्ष तोडीवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील तरतूदीनुसार दंड आकारण्यात येईल. याबाबत कडक कारवाई करण्यात येईल.
शहरातील वृक्ष संवर्धनाकरीता असलेल्या सामाजिक संस्था यांचा शहर हिरवेगार करण्याकरीता तसेच पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्याकरीता सहभाग घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात येत आहे.

Previous articleविदर्भाची पंढरी भाविकांच्या भक्तीत दुमदुमली शेकडो पालख्या आणि विविध कार्यक्रमात श्रींचा ११२ वा पुण्यतिथी ऋषीपंचमी उत्सव साजरा
Next articleहिंगणघाट पोलीस स्टेशन दूरध्वनी नंबर बंद, जनतेने संपर्क कुठे साधायचा ?