Home वर्धा हिंगणघाट पोलीस स्टेशन दूरध्वनी नंबर बंद, जनतेने संपर्क कुठे साधायचा ?

हिंगणघाट पोलीस स्टेशन दूरध्वनी नंबर बंद, जनतेने संपर्क कुठे साधायचा ?

302

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट पोलीस स्टेशन संपर्क दूरध्वनी नंबर हा अनेक दिवसापासून बंद आहे. अनेकदा फोन लावून सुद्धा फोन लागत नाही अशी जनसामान्यातून माहिती मिळाली. सध्या पोळा, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, धम्म चक्र परिवर्तन ,दशहरा असे अनेक कार्यक्रम हिंगणघाट व ग्रामीण भागात होत असतात. अशा वेळेस काही घटना घडल्यास जनतेने संपर्क कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे ?
कोणतीही घटना घडल्यास सर्वप्रथम पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करण्यात येतो, परंतु सध्या हिंगणघाट पोलीस स्टेशन चा नंबर हा बंद आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशन दूरध्वनी नंबर हा अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे कदाचित बिल भरले नसल्यामुळे कनेक्शन बंद करण्यात तर आले नाही ? वरिष्ठांकडून याकडे लक्ष देण्याची गरज आहे .

Previous articleनगरपरिषद हद्दितील बिना परवानगी झाडे / वृक्ष तोडल्यास होणार कारवाई!
Next articleहिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर ( डीएससी ) चे ई -टेंडरचा गैरवापर