Home जळगाव हिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर...

हिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर ( डीएससी ) चे ई -टेंडरचा गैरवापर

512

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

तालुक्यातील हिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर ( डीएससी ) चे ई -टेंडरचा गैरवापर करून आदीवासी महिला सरपंच यांना धमकी देत मानसिक छळ करून खंडणी मागणाऱ्यांवर आदीवासी विशेष कायद्या अंतर्गत चौकशी करून संबधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीचे तक्रार संदर्भातील निवेदन आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच, महाराष्ट्रच्या वतीने राज्याचे अध्यक्ष एम बी तडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना देण्यात आले आहे . या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी यांनी म्हटले आहे की हिंगोणा तालुका यावल या ग्रामपंचायतीवर आदीवासी तडवी समाजाची महीला सौ रूखसाना फिरोज तडवी या सरपंचपदाचा कारभार सांभाळत आहेत . ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील विकास कामे ही पारदर्शी व्हावी याची जबाबदारी सरपंच आणी ग्रामसेवक यांची असते परंतु हिंगोणा गांवातील विकासकामे ही ठराविक किंवा ठरलेल्या एकच व मर्जीतील ठेकेदार यांच्या वतीने होत असल्याचे सरपंच सौ .रूखसाना तडवी यांचे म्हणणे असुन , संबधीत कामांच्या कार्यपद्धती बद्दल सरपंच यांनी ग्रामसेवक यांना डीएससी गैरवापर होत असल्याबाबत च्या सुचना दिल्या असतांना ग्रामसेवक आर टी बाविस्कर यांनी या गंभीर विषयाकडे टाळाटाळ करीत दुर्लक्ष केते . हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्ती योजनेची कामे मंजुर असुन ,या कामांची ई – टेंडर प्रक्रीया करणे करिता सरपंच यांची डीएससी ची आवश्वता असते , असे असतांना ग्रामसेवक यांनी टेंडर प्रक्रीयेत घोळ करून बेकाद्याशिररित्या ठरावीक किंवा ठरलेल्या एकच ठेकेदारास लाखो रुपयांची बांधकाम भ्रष्ठाचार करण्याच्या हेतुने दिली आहे . असा प्रकारची लाखो रुपयांची बेकाद्याशीर कामे करून सरपंच यांच्यावर डीएससी मिळवण्यासाठी वरिष्ठांकडे खोटया तक्रारी करून तसेच काही गुन्हेगार वृत्तीची ठेकेदार मंडळी यांनी या आधीच ईतर ग्रामपंचायतींच्या घेतलेल्या कामांची विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातुन चौकशी करण्यात यावी असे तक्रार निवेदनात म्हटले असुन , महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे दिनांक २७ मे२०१५ रोजीचे शासन निर्णय क्रं. निविदा २०१४ / प्र . क्र .२६० / परा-७नुसार ई – निविदा प्रणाली नियमानुसार ग्रामसेवक आर टी बाविस्कर हे ई – टेंडर करीत नसुन बेवसाईटवर बांधकामाची निविदा प्रक्रीया करण्यासाठी ग्रामसेवक हा सरपंच यांची डीएससीचा बेकायद्याशीर पद्धतीने गैरवापर करून बांधकाम टेंडर हे शासनच्या ई – टेंडर बेवसाईटवर काही वेळेसाठी फ्लेस करतात व त्यानंतर हिड करतात व ते काम असे करीत असतांना सदरचे काम बद्दलची माहिती ऑनलाईन ईतरांना दिसत नसल्याने ईतर ठेकेदारांना टेंडर भरता येत नाही अशा प्रकारे ग्रामसेवक यांच्या व काही स्वार्थी मंडळींच्या संगनमतांने हा सर्व घोळ आपल्या मर्जीतील ठेकेदाराच्या पदरात बांधकाम पाडत असतात , या सर्व प्रकारामुळे ईतर होतकरू सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांना संधी मिळत नसत्याचे चित्र निर्माण झाले आहे . या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करण्यात येवुन कायद्या दुरुपयोग करून आदीवासी समाजातील महिला सरपंच यांना आर्थिक स्वार्थासाठी धमकी देवुन मानसिक छड करणारे शासकीय अधिकारी व या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष सरदार बलदार तडवी व आदीवासी समाजातील असंख्प महीलांच्या वतीने देण्यात आले असुन तसे न झाल्यास संघटनेच्या वतीने तिव्र आदोंलन छेडले जाईल असा ईशारा देण्यात आला आहे .

Previous articleहिंगणघाट पोलीस स्टेशन दूरध्वनी नंबर बंद, जनतेने संपर्क कुठे साधायचा ?
Next articleयावल गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ चौधरी यांनी स्वीकारला पदभार