Home Breaking News संग्रामपूर तालुक्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्यात यावे वैद्यकीय अधिकारी संग्रामपूर यांना...

संग्रामपूर तालुक्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्यात यावे वैद्यकीय अधिकारी संग्रामपूर यांना निवेदन

248

 

आज दिनांक 02/09/2022 रोजी संग्रामपुर तालुक्यातील बोगस पॅथॉलॉजी जिल्ह्यात व अनधिकृत प्यारा वैद्यकीय परिषद ची नोंदणी केलेल्या क्लिनिकल लॅब संचालक विरुद्ध कारवाई करण्यात यावी व पॅथॉलॉजी लॅबला सील ठोकण्यात यावे अशी मागणी संग्रामपूर तालुका लॅब लॅब असोसिएशन च्या वतीने करण्यात आलेली आहे संग्रामपूर तालुक्यातील लॅब असोसिएशन सदस्य ने संग्रामपूर तालुक्यातील टी एच ओ, तहसीलदार व ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र पॅरा वैद्यकीय परिषद अनधिक अधिनियम 2011 (2016 चा महा.6) चे कलम 26 अन्वय लॅब टेक्निशियन नोंदणीकृत होणे अनिवार्य आहे. तरी अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येत अनधिकृत टेक्निशन अवैधरित्या आपली लॅबची दुकाने चालवत आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यामध्ये अनेक प्रयोगशाळा तंत्रज्ञान कडून आदिवासी विभागातील रुग्णांची आर्थिक व मानसिक लूट होत आहे.
तरी संग्रामपूर तालुक्यातील सर्व लॅब धारकांची शहानिशा करून दोषी प्रयोगशाळा तंत्रज्ञान वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील लॅब असोसिएशन च्या वतीने करण्यात येत आहे असे निवेदन देण्यात आले यावेळी संग्रामपूर तालुक्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ निवेदन देण्याकरिता हजारो होते. निवेदन देण्याकरिता संग्रामपूर मधील प्रशांत इंगळे, राहुल गावंडे ,विजय रहाटे, अशोक वानरे ,सय्यद वसीम, शेख किस्मत ,देवानंद तायडे ,निखिल शेळके व इतर सदस्य हजर होते.

Previous articleयावल गटविकास अधिकारी म्हणून एकनाथ चौधरी यांनी स्वीकारला पदभार
Next articleबेपत्ता असलेल्या युवकाचे प्रेत सापडले शहरालगतच्या शेत तळ्यात मिळाला शव