Home Breaking News बेपत्ता असलेल्या युवकाचे प्रेत सापडले शहरालगतच्या शेत तळ्यात मिळाला शव

बेपत्ता असलेल्या युवकाचे प्रेत सापडले शहरालगतच्या शेत तळ्यात मिळाला शव

831

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

नातेवाईकांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात असलेल्या इदगाह परिसरातील एक 28 वर्षे युवक गणपती आगमनाच्या दिवशी पासून बेपत्ता होता आज सदर इसमाचा मृतदेह हा शेगाव शहरा तील सुरभी नगरला लागून असलेल्या एका शेततळ्यामध्ये मिळून आला. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून मृतकाच्या नातेवाईकांनीही शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार नोंदवली आहे.
नजीरउल्ला भुरेखा वय 28 राहणार गड्डा परिसर शेगाव हा युवक मागील चार दिवसांपासून अचानकपणे बेपत्ता झालेला होता. दरम्यान त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना शहरातील सुरभी नगर भागात लगत असलेल्या शेतातील शेततळ्यामध्ये त्याचा मृतदेह आज तरंगताना काही नागरिकांना दिसून आला. याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनला देण्यात आल्यावरून पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन क्षवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान सदर युवकासोबत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलेला असून तशी तक्रार शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.या संदर्भात शहर पोलीस पुढील तपास करीत आहे.

Previous articleसंग्रामपूर तालुक्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्यात यावे वैद्यकीय अधिकारी संग्रामपूर यांना निवेदन
Next articleभ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडून उपविभागीय अधिाऱ्यांना निवेदन खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी