Home वर्धा श्री सिंध गणेश मंडळाला बदनाम केल्या प्रकरणी मंडळ पदाधिकारी आक्रमक

श्री सिंध गणेश मंडळाला बदनाम केल्या प्रकरणी मंडळ पदाधिकारी आक्रमक

493

 

हिंगणघाट पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली कारवाई करण्याची मागणी

हिंगणघाट:- मलक नईम

शहरातील गुरुनानक वार्ड येथील सुप्रसिद्ध श्री सिंध गणेश मंडळ मागील १६ वर्षा पासून सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे मात्र दोन दिवसा अगोदर या मंडळात हुक्का पार्टी सुरू असल्याची दुसऱ्या जागेवरील व्हिडिओ या मंडळाशी जोडून खोटी बातमी पसरवल्याने सदर मंडळाची बदनामी केल्याचा आरोप करीत मंडळाचे पदाधिकारी तसेच बजरंग दल समवेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट चे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे चुकीची बातमी पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुकेश उदासी,उपाध्यक्ष विक्की तकतानी,लखन पाखरानी,राहुल मोटवानी,बजरंग दलचे तालुका अध्यक्ष दीपक शर्मा,उपाध्यक्ष प्रशांत तिवारी,सामाजिक कार्यकर्ते दिनेश वर्मा,संजय माडे,नगरसेवक सोनू गवळी समवेत मंडळाचे आदी सदस्य उपस्थित होते.

Previous articleजळगाव (जा) तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर “सहाय्यक परिचारिका मिडवाइफरी” (ANM) ची पदे तात्काळ भरा…
Next articleफॉरेस्ट परिसरात घुसल्या मोजावी लागेल मोठी रक्कम , २५ शेळ्या आणि १४० मेंड्यासह १लाख ४० हजाराचा दंड ; वनपरिक्षेत्र अधिकारी ऍकेशन मोडवर मेंढपळणाचे धाबे दणाणले