Home Breaking News चुंचाळे गावात एका शेतमजूर तरुणांने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या

चुंचाळे गावात एका शेतमजूर तरुणांने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या

758

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

यावल : तालुक्यातील चुंचाळे गावातील 35 वर्षीय शेतमजुराने साकळी शेतशिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सतीश शेनफडू पाटील (वय.35) असे मयताचे नाव आहे.

 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सतीश हा तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी साकळी शिवारातील उज्जैनसिंग राजपूत यांच्या शेत-शिवारात कामाला गेला होता. त्यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला त्याने ठिबक नळीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला व तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. मयत सतीश पाटील याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी योगेश कृष्णा पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सतीश पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.

Previous articleफॉरेस्ट परिसरात घुसल्या मोजावी लागेल मोठी रक्कम , २५ शेळ्या आणि १४० मेंड्यासह १लाख ४० हजाराचा दंड ; वनपरिक्षेत्र अधिकारी ऍकेशन मोडवर मेंढपळणाचे धाबे दणाणले
Next articleश्री गणेश विसर्जन काळात नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणारा : 36 हजार 550 रुपये किमतीचा 1120 किलो भेसळयुक्त गुलाल जप्त