Home Breaking News शेती माती संस्कृती’च्या वतीने पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

शेती माती संस्कृती’च्या वतीने पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

171

 

स्पर्धेत सहभागी होण्याचे हर्षल पाटील फदाट यांचे आवाहन

‘शेती,माती,संस्कृती’ आयोजित कार्यक्रम पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी असुन. स्पर्धेतील प्रवेश विनामूल्य असून रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. घरोघरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. दहा दिवस भक्तिमय वातावरण असते. गणेशोत्सवकाळात विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जागतिक पातळीवर पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठीश शेती माती संस्कृती,टिम प्रयत्न करणत असते. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून ,शेती,माती,संस्कृती टिमचं उदिदष्ट आहे.

शेती,माती,संस्कृती आयोजित कार्यक्रम,पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित केले आहे.स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ असे चार पारितोषिक देण्यात येणार आहेत. रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हर्षल पाटील फदाट यांनी केले आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, सुनील फदाट, सुनिल शिकारे, नारायण सोनुने, गजु निकम, राहुल पाटील, रवी फदाट,ऋषी वाकुडे, शकील शेख,व शेती माती संस्कृती टिम परिश्रम घेत आहे.

Previous articleभारत विद्यालयाचा यश थुल याची जिल्हास्तरावर निवड पंचायत समिती हिंगणघाट यांच्या तर्फे विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा
Next articleसार्वजनिक नवयुवक गणेश मित्र मंडळाचे 34 वे वर्ष उत्साहात पार पाडले