Home Breaking News आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर..

आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर..

229

 

बोदवड:- सतिष बावस्कर

बोदवड तालुक्यातील जलचक्र बुद्रुक येथे आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतिबिंदु तपासणी शिबिर पार पडले. यावेळी 117 लोकांची तपासणी झाली. यात मोतिबिंदुचे 21 रुग्ण , पडद्याचे 6 रुग्ण , नासुरचे 4 असे एकूण 31 रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथे पुढील उपचार होणार आहेत.
14 सप्टेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटिल यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून साजरा होत असतो. यावेळी आमदार चंद्रकांत पाटिल यांनी शिबिराचा व्हिडिओ काॅलद्वारे आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटिल , माजी जि.प.सदस्य डाॅ ऊद्धव पाटिल , नगरसेवक सुनिल बोरसे , गोपाळ पाटिल यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे आयोजन आमीन मुलतानी ,जिलानी मुलतानी सोमेश्वर (बंटि) पाटिल , नितीन पाटील यांनी केले असून जिलानी मुलातानी , धनराज पाटील, अमोल (गोलु) पाटील, नितीन ईंगळे, मयुर पाटील, विजय सपकाळ, अक्षय पाटील, प्रतीक पाटील, संदिप पाटील, चेतन पाटील, गजानन राऊत, रमजान मुलतानी, फिरोज मुलतानी,जिवन पाटील, ईश्वर शळके, पंडित घुले, योगेश पाटील, अरुन गोसावी, संतोष खरे, उमेश पाटील आदींचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

Previous articleपंचायत समिती यावलच्या सभागृहामध्ये ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांची व सरपंच यांची संदर्भातील संयुक्त आढावा बैठक पार पडली .
Next article2022 मध्ये नगरसेवक निवडताना विचार जरूर करा ?