Home Breaking News 2022 मध्ये नगरसेवक निवडताना विचार जरूर करा ?

2022 मध्ये नगरसेवक निवडताना विचार जरूर करा ?

495

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट शहरात सर्वच प्रभागात अवैध धंदे सुरू आहे. याला तुम्ही आम्ही जबाबदार आहे. अवैध्य धंदे बंद करायचे असेल तर प्रामाणिक व दूरदृष्टी असलेला नगरसेवककाला संधी मिळायला पाहिजे. कारण आज शासनात अवैध धंदे करणाऱ्यांचा बोलबाला आहे त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही झाली तर थातूरमातूर कारवाई होते. त्यामुळे जनता त्यांच्या विरोधात जात नाही. जर आपल्याला खरोखरच वार्डातील अवैध धंदे बंद करायचे असते तर प्रामाणिक कार्य करणारा नगरसेवकाला संधी ?
सध्या हिंगणघाट शहराला हर्षल गायकवाड यांच्या रूपाने चांगला मुख्याधिकारी लाभलेला आहे त्यांनी आल्याबरोबरच हिंगणघाट शहरातील बॅनर फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावायचे असल्यास नगरपालिका परवानगी असणे आवश्यक आहे हा धाडसी निर्णय घेतला यामुळे हिंगणघाट नगरपालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. दुसरा निर्णय सार्वजनिक ठिकाणी मोकाट असलेले जनावर यांना कांजी मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली. परंतु ही व्यवस्था करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली परंतु याबद्दल कर्मचारी यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही कारण यांना कोणतेही सहकार्य लोकप्रतिनिधी कडून मिळत नाही कारण हे सर्व अवैध धंदे करणारे लोकप्रतिनिधी यांच्या संपर्कातील असल्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार आज अशीच परिस्थिती सर्वीकडे आहे कोणीही अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात धाडस करत नाही कारण आज शासन करते हेच अवैध धंदेचे निर्माते आहे. पत्रकार सुद्धा खरं बोलणारे नाही जे खरं बोलतात त्यांच्यावर आरोप होतात. पत्रकारच आज पार्टीची प्रवक्ते आहे .

Previous articleआमदार चंद्रकांत पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिर..
Next articleविद्याभारती विदर्भ हिंगणघाट तालुका बैठक संपन्न