Home Breaking News यावलच्या महसूल पथकाने दगड गोटे वाहतूक करणारे दोन डंपर पकडले दोघे डंपर...

यावलच्या महसूल पथकाने दगड गोटे वाहतूक करणारे दोन डंपर पकडले दोघे डंपर पोलीस वसाहत मध्ये लावण्यास पोलिसांचा नकार

803

 

 

यावल : तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तहसील कार्यालयाच्या गौण खनिज वाहतुक नियत्रंण पथकाने अवैध गौण खनिज वाहतुक करणारे दोन डंपर पकडले. ही कारवाई बुधवारी भुसावळ – अंजाळे दरम्यान करण्यात आली. दोघा डंपर मध्ये बारा ब्रास अवैधरित्या दगड गोटे वाहतूक केले जात होते. तर महसुल पथकाने पकडलेले दोघे डंपर पोलीस प्रशासनाने आपल्या आवारात लावण्यास नकार दिला. तेव्हा हे वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहे
यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करीता भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. या भरारी पथकातील मंडळ अधिकारी सचिन जगताप, मिलिंद देवरे, बबिता चौधरी, शेखर तडवी, तलाठी एस. व्ही.सूर्यवंशी, समीर तडवी, वसीम तडवी, ईश्वर कोळी या पथकाने बुधवारी सायंकाळी भुसावळ – अंजाळे दरम्यान गस्तीवर असतांना डंपर क्रमांक एम. एच. १९ सी.वाय ८२१८ व एम.एच.१९ सी.वाय ९५९५ हे दोघे अवैद्य रित्या दगड गोटे वाहतांना आढळून आले चौकशी अंती त्यांच्या कडे दगडगोटे वाहतुकीचे परवाने मिळून आले नाही तेव्हा या वाहनांचे मालक पृथ्वी सिंग भुसावळ व रतन शेठ पाडळसा या दोघांना दंडाच्या नोटीस बजावून वाहत ताब्यात घेण्यात आले आहे.या दोघा वाहनात १२ ब्रास दगड गोटे मिळुन आले आहे.या कारवाई मुळे अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाहन लावण्यास पोलिसांचा नकार
महसूल पथकाने पकडून आणलेले विविध वाहन पोलीस ठाण्याच्या मागील बाजुस असलेल्या कवायत मैदानावर लावले आहे मात्र, आता या मैदानावर वाहन लावण्यास पोलीस निरीक्षकांनी नकार दिल्याचे तहसीलदारांनी सांगितले तेव्हा दोघं वाहन सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहे.-पुर्ण-फोटो आहे

Previous articleविद्याभारती विदर्भ हिंगणघाट तालुका बैठक संपन्न
Next articleश्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ व छत्रपती सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर