शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे
बुधवार दि 07 सप्टेबर रोजी शेगाव शहरामधून 5 दिवसाच्या गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक ढोलताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर मोठ्या थाटात निघाली.. मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात गुरुकुल अकॅडमी च्या वर्ग 11 वी आणि 12 विच्या शेकडो मुलामुलींनी पारंपरिक पोशाख परिधान करत आनंद उत्सव साजरा केला. प्रसंगी वातावरण भक्तिमय झाले होते. विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न , उर्जाशील आणि आत्मविश्वासू असले पाहिजे तसेच संस्कृतीशी नाळ जुळलेली राहिली पाहिजे या उद्देशपूर्तीसाठी अशा प्रकारचे सार्वजनिक उपक्रम गुरुकुल अकॅडमी च्या वतीने नेहमी राबवले जातात अशी माहिती याप्रसंगी गुरुकुलचे सहसंचालक प्रा स्वप्निल उमाळे सर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कार्यक्रमाचा शेवट
महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवगर्जना तसेच राजमुद्रेनी झाला..