Home Breaking News बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणुक संचालकातून न घेता मतदारातून घ्या- माजी आमदार...

बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणुक संचालकातून न घेता मतदारातून घ्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

222

 

विविध सहकारी संस्थांचे, ग्रामपंचायत,अडते,व्यापारी व हमाल-मापारी या मतदारांना बाजार समितीचा सभापती निवडण्याचा अधिकार द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

हिंगणघाट:- ०८ सप्टेंबर २०२२
राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
आपणास बाजार समितीमधील संचालक निवडून देण्याच्या या दृष्टीकोनाने शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार देण्याबाबत निर्णय घेतला आहे व त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मिळालेल्या अधिकारामुळे आपले शेतकऱ्यांनी स्वागत केले.परंतु दी. ०६/०९/२२ ला राज्य सहकारी निवडणूक प्रादीकरणाद्वारे राज्यातील २८१ बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये जुन्याच पद्धतीने म्हणजे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत,अडत्या/व्यापारी व हमाल-मापारी यांच्या मतदार यादीनुसार बाजार समितीवर त्यात्यामतदार संघातून निवडणूक लढण्याचा व मतदानाचा अधिकार दिला आहे. यावरून शेतकऱ्यांमध्ये परत निराशा दिसून येत आहे.
करिता शेतकरी प्रतिनिधी म्हणून माझी आपणास विनंती आहे की निवडणूक प्रधिकरणाद्वारे प्रसिद्ध केलेल्या निवडणूक
कार्यक्रमाला स्थगिती देण्यात यावी व जर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे निवडणुकीचा खर्च वाढत असल्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयाचे अंमलबजावणी करू शकत नसाल तर सभापतीची निवडणूक किमान विविध
सहकारी संस्थांचे, ग्रामपंचायत,अडते,व्यापारी व हमाल-मापारी यांच्या मतदार संघात जेवढे मतदार आहे त्या मतदारांना सभापती करिता निवडून देण्याच्या दृष्टीने मतदान करण्याचे अधिकार द्यावे व त्या जनआधारावर सभापतीची निवडणूक करावी नाकी संचालक मधून त्यामुळे घोडेबाजार थांबेल व योग्य व्यक्तींची निवड मतदार मधून सभापती पदावर होईल त्यामुळे निवडणूक खर्चाचा भार सुद्धा बाजार समितीवर पडणार नाही व जन मतातून बाजार समितीवर नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रमाणे सभापती विराजमान होईल यांची कृपया नोंद घेऊन शेतकऱ्यांना हिताच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्यात यावी निवेदनाद्वारे मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देऊन केली आहे.

Previous articleआदर्श उपक्रम राबवत गुरुकुल अकॅडमी चे सर्वत्र कौतुक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवत शेगाव मध्ये ठेवला आदर्श
Next articleब्रिगेड सेना युती नंतर बुलढाणा जिल्ह्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र कार्यकारणी पदाधिकारी बैठक संपन्न