Home Breaking News बोदवड येथे शारदा कॉलनी गणेश मित्रमंडळाकडून गणेशोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न

बोदवड येथे शारदा कॉलनी गणेश मित्रमंडळाकडून गणेशोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न

218

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर.

बोदवड येथील शारदा कॉलनी मधील गणेश उत्सव मित्रमंडळा कडून गणेशोत्सव कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले.या कालावधीमध्ये महिला व मुलां-मुलींकडून दांडिया खेळण्यात आला.तसेच मुलांसाठी लिंबू,चमचा स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा,सामान्य ज्ञानावर इ.१ली ते १२वी च्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली.सामान्य ज्ञान स्पर्धेत लहान गटात रोहित विवेक वखरे,प्रियल राजपूत,प्रणाली वखरे,प्रतीक्षा सपकाळ,साई अग्रवाल यांना सर्वाधिक गुण मिळाले.तसेच मोठ्या गटातून तुषार गंगतिरे,समृद्धी सपकाळ,कुणाली अग्रवाल यांना सर्वाधिक गुण मिळाले.गणेश मित्र मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना मंडळा कडून बक्षिसे देण्यात आली.व मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या गणेशोत्सवासाठी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल गंगतिरे,स्वप्नील गंगतिरे,शिवम अग्रवाल,आनंद गंगतिरे,अतुल हिवराळे,अतुल गंगतिरे,डीगंबर पाटील,ऋत्विक पाटील,सुभाष राजस्थानी यांनी परिश्रम घेतले तसेच बबन शेळके सर,पुरुषोत्तम गड्डम सर,विवेक वखरे सर ,सचिन राजपूत,तानाजी पाटील ,बी टी बावस्कर,डॉ.संजय कळसकर,वसंतराव सपकाळ,संजय नंदवे ,शांताराम शेळके, यांचे चांगले सहकार्य लाभले.दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला

Previous articleब्रिगेड सेना युती नंतर बुलढाणा जिल्ह्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र कार्यकारणी पदाधिकारी बैठक संपन्न
Next articleबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालते महाराष्ट्र एक्सप्रेस वर तासिका शिल्प निर्देशकांना काढले नोटीस न देता