Home जळगाव बोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालते महाराष्ट्र एक्सप्रेस वर तासिका शिल्प निर्देशकांना काढले...

बोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालते महाराष्ट्र एक्सप्रेस वर तासिका शिल्प निर्देशकांना काढले नोटीस न देता

547

 

बोदवड प्रतिनिधी सतीश. बावस्कर

बोदवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर न राहता आपल्या मनमानी पद्धतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते ,कर्मचारी मुख्यालय न राहता शासनाची फसवणूक करत आहे ,महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणे बंधनकारक केले आहे .यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय राणे न राहण्याची सूट देण्यात येते का ?आ प्रश्न उपस्थित होत आहे शिल्प निर्देशक गट निर्देशक कार्यालयीन कर्मचारी वेळेत हजर होत नाही तसेच कंत्राटी तासिका शिल्प निर्देशक यांना कोणती सूचना किंवा पत्र न देता त्यांना शिल्प निर्देशक यांनी कमी करण्यात आले आहे या शिल्पनेदेशकांचे कालावधीतील विद्यार्थ्यांचे निकाल कमी लागेल का .?त्यांना या आधी सूचना किंवा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे का ? अशा प्रकारची कोणती सूचना पत्र न देता तासिका शिल्प निर्देशक यांना कमी करण्यात आले आहे नवीन भरती प्रक्रिया राबवली आहे किंवा नाही ? राबवली असेल तर वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केली आहे का असा? प्रश्न उपस्थित होत आहे काही कंत्राटी तासिका शिल्प निर्देशक यांनी अंतर्गत मनमानी हुकूमशाही पद्धतीला त्रासून निर्देशक पद सोडून दिले आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे कामकाज नियमित वेळेवर चालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी उपक्रम लावणे आवश्यक आहे सदरची प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र एक्सप्रेसच्या वेळीनुसार सुरु होणे व बंद होते हे कुठेतरी थांबले पाहिजे हा प्रकार कित्येक वर्षापासून सुरू आहे अशी जागृत नागरिकांकडून चर्चा होत आहे

Previous articleबोदवड येथे शारदा कॉलनी गणेश मित्रमंडळाकडून गणेशोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न
Next articleयावल पोलीस वसाहतीतील अनेक वर्षापासुन जप्त वाहनांमुळे पोलीस कुटुंबीयांच्या समस्या वाढल्या महीलांनी दिले तहसीलदारांना निवेदन