वन जमीन तात्काळ ताब्यात घ्यावी अन्यथा आंदोलन उपोषण करण्याचा इशारा.
-मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत कोथळी बीट वन विभागाची जमीन करून अतिक्रम करणे व शासनाची दिशाभूल करून खोटे गुन्हे दाखल करण्याप्रमाणे सहकार्य करणाऱ्या वनरक्षकावर वन हक्क अधिनियम असावा कारवाई व्हावी. अशा प्रकारचे निवेदन समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्कप्रमुख शे.सईद शे.कदीर यांनी जिल्हाधिकारी तथा वन हक्क समिती अध्यक्ष बुलढाणा यांना दि.9/9/ 2022 रोजी दिले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले की तरोडा गाव बीट कोथळी मोताळा परिक्षेत्र प्रादेशिक अंतर्गत दावे दाखल केलेले आहेत त्यापैकी बहुतेक दावे खोटे आहेत. त्यापैकी गजानन सरदार सिंग मोरे यांनी शासनाची 0. 88 हेक्टर जमीन खोटे कागदपत्र देऊन बळकावली आहे. त्यामध्ये त्यांनी 21 /6 /88 चे प्रथम गुन्हा रिपोर्टमध्ये खोडतोड करून शासनाची दिशाभूल केली आहे. ह्याकरीता गजानन मोरे यांचे आधार कार्ड नुसार शहानिशा करावी. आरोपी अल्पवयीन कसे करून घेतले. न्यायालयीन कागदपत्रांमध्ये खोडतोडकरुन दिशाभूल करण्यात आली.व दिशाभूल माहिती पुरवून वन विभागाची जमीन हडप केली आहे त्यासाठी त्यांना त्यांचे भाऊ अनिल सरदार सिंग मोरे वनरक्षक वन विभाग मोताळा यांनी सहकार्य केले आहे .तसेच खोटे कागदपत्र शासनास दाखल करून प्रोत्साहित केले. याबाबत गजानन सरदार मोरे यांचे वन हक्क अधिनियम 2006, 2008 ,2012 अन्वये प्रकरण दाखल आहे. त्याची तपासणी केल्यास सर्व गैरप्रकार उघडकीस येईल कायद्याची कसलीही भीती न बाळगता फायद्यासाठी व जमिनीवर दरोडा घातला आहे .त्यामुळे त्यांचे सह इतर गुन्हेगारावर गुन्हे दाखल करावेत व शासकीय व जमीन ही तात्काळ ताब्यात घ्यावी .अन्यथा आमचा पक्ष राज्यस्तरीय आंदोलन उपोषण करेल सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना पाठवले आहेत,