Home Breaking News मुंगळा येथील संत सावतामाळी मंडळाच्या वतीने गणरायाचे नामघोषात विसर्जन..

मुंगळा येथील संत सावतामाळी मंडळाच्या वतीने गणरायाचे नामघोषात विसर्जन..

382

 

टाळमृदंगाच्या गजरात पार पडले विसर्जन ,

संत सावतामाळी मंडळाने मागील ५० वर्षाची डीजे बॅंडची परंपरा बंद करुन वारकरी सांप्रदायीक पद्धतीने गणरायांना निरोप दिला….

विठ्ठल भागवत, मालेगाव तालुका प्रतिनिधी

मालेगाव तालुकातील मुंगळा येथील मागील ५० वर्षाची बॅंड डिजेची परंपरेला फाटा देऊन वारकरी सांप्रदायाचे संस्कार बालमनावर व युवावर्गावर रूजविण्यासाठी गावातील प्रमुख मंडळ असलेल्या संत सावता माळी गणेश मंडळाने अनोख्या पद्धतीने गणेश विसर्जन केले…
महाराष्ट्रातील भजनसम्राट गोभणी येथील बाल भजनी मंडळ यांच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली….
वारकरी अभंग भजने गौळणी भारुडं फुगडी इत्यादींचे उत्कृष्ट सादरीकरण करत विसर्जन मिरवणूकीने सर्वांचीच मने जिंकली.
गणरायाची मिरवणुक काढुन एक नवा पायंडा व आदर्श संत सावता माळी मंडळाने युवा पिढीसमोर ठेवल्याने समाजाच्या सर्व स्तरातून संत सावतामाळी मंडळाचे कौतुक होत आहे…तसेच कार्यक्रमाला महीला मंडळीं व पुरूष मंडळी बहुसंख्येने मिरवणूकीत उपस्थित होती. तसेच कार्यक्रमासाठी संत सावतामाळी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच माळी समाजातील सर्वानी कार्यक्रमाला सहकार्य केले.

Previous articleरोटरी क्लब व नगर परीषद हिंगणघाट च्या गणेश विसर्जन कुंडला भव्य प्रतिसाद
Next articleआ लताताई सोनवणे यांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल ठेवला कायम