Home Breaking News आ लताताई सोनवणे यांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल ठेवला कायम

आ लताताई सोनवणे यांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल ठेवला कायम

225

 

. जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर.

जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री शिंदे गटाच्या चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्र बाबत हायकोर्टाने दिलेल्या निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी 9 सप्टेंबर सर्वोच्च न्यायालयाच्या द्विस सदस्यीय घटनापिठाचे सदस्य न्या के एम जोसेफ व न्या ऋषिकेश यांनी जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे दरम्यान जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती आमदार लता सोनवणे यांच्या विरोधात महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती आमदार लता सोनवणे यांच्या टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे केली होती लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांच्या जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते माजी आमदार जगदीचंद्र वळवी यांनी सांगितले की उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला आहे आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे ती जलद गतीने व्हावी आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी शिफारस मागणी आहे तसेच विधानसभेत दोन नंबरच्या उमेदवाराला विजय घोषित करावे

Previous articleमुंगळा येथील संत सावतामाळी मंडळाच्या वतीने गणरायाचे नामघोषात विसर्जन..
Next articleपोलीस भरतीच्या तयारी करिता गेलेल्या हिंगणघाट येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू