Home Breaking News आसगावचे राजेश डोमळे यांची पुन्हा एक उंच भरारी ! ———–

आसगावचे राजेश डोमळे यांची पुन्हा एक उंच भरारी ! ———–

274

 

 

—-शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य राज्यातील पुणे येथे स्थित सुप्रसिद्ध “वृंदावन फाऊंडेशन” आणि विश्वविख्यात “डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे” यांचे तर्फे दिनांक 18 सप्टेंबर ला “गुरुजण गौरव सोहळ्याचे” आयोजन करण्यात आलेले आहे ! या सोहळ्यात देशभरातून फक्त निवडक 15 प्रतिभावंत ,कृतिशील ,प्रयोगशील आणि अभ्यासू शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे .अभिमानाची गोष्ट म्हणजे या सत्कार सोहळ्यासाठी मूळचे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास येथील राजेश बाळकृष्ण डोमळे यांची निवड करण्यात आलेली आहे ! राजेश बाळकृष्ण डोमळे हे देशातील सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक असून नुकतेच त्यांना त्यांच्या “इंडिया निड्स कलाम नॉट कसाब” या इंग्रजी कादंबरीसाठी “एशियाज बेस्ट ऑथर अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले होते. राजेश बाळकृष्ण डोमळे सध्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथे गुरुकुल आश्रमशाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ! 18 सप्टेंबरला डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे संपन्न होणाऱ्या सत्कार समारंभाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून लातूरचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जगतगुरु तुकोबारायांचे वंशज हभप शिवाजीराव मोरे महाराज आणि शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ.अर्चनाताई कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे ! राजेश डोमळे यांनी संपादन केलेले हे यश अभूतपूर्व आणि अभिमानास्पद असून संपूर्ण भंडारावासीयांना त्यांच्यावर गर्व आहे ! “गुरुजन गौरव” सोहळ्यासाठी निवड झाल्याबद्दल राजेश डोमळे यांचेवर सर्वत्र अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे !

Previous articleशेगाव तालुक्यातील लासुरा गावामध्ये राष्ट्रीय पोषण आहार राबविण्यात आले.
Next articleमानमोडी येथे स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत आरो मशीन प्रणाली चे उद्घाटन