यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन जिल्ह्यात ओळखला जातो , या तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील गाव , वस्ती ,पांड्यांवर तसेच शहरी भागात तालुका आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातुन संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान (LCDC)सक्रिय क्षयरुग्ण शोध (ACF) मोहीम जागरूकता अभियानाची दि १३ ते ३० सप्टेंबर पासुन सुरूवात करण्यात येत आहे तालुक्यातील सुज्ञ व जागरूक नागरीकांनी या मोहीमेत सहभाग घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ गफुर तडवी यांनी केले आहे.
या संयुक्त कुष्ठरोग शोध व जागरूकता अभियाना अंतर्गत यावल तालुक्यात ग्रामीण २११ आणि शहरी क्षेत्रासाठी १० पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. पथक आपल्या कुष्ठरोग शोध मोहीम जागरूकता अभियान सकाळी ७ वाजेला सुरुवात करणार आहेत तसेच सर्व गावामधून/शहरातील नागरीकानी आशाताई यानी गृह भेट दिली असता त्यांना नागरीकांनी सहकार्य करावे व आजाराचे लक्षण असल्यास त्याना साविस्तर माहीती देवुन आणि तपासणी करून घ्यावी. संबंधीत रूग्णाच्या आरोग्य विभागा व्दारे आजाराचे निदान झाल्यास तत्काळ उपचार सुरू करण्यात येईल. कुष्ठरोग मोहीम अंतर्गत आपल्यावर आरोग्य विभागाच्या वतीने होणाऱ्या उपचाराची माहिती गुप्त ठेवण्यात येईल तरी यावल तालुक्यातील सर्व नागरीकांनी शासनाच्या या आरोग्य विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहीम व जागरूकता या अभियानास १०० टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे अशी माहिती व आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यावल गफुर तड़वी यांनी केले आहे . यावल तालुकाआरोग्य विभागातील क्षयरोग,पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपुर्ण मोहीम राबविली जाणार आहे .