यावल तालुका( प्रतिनिधी) विकी वानखेडे
गावठी पिस्तोल विक्री करण्याचे उद्देशाने आलेल्या परप्रांतीयास तालुक्यातील किनगाव येथील मुख्य रस्त्यावर जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याचे मोटर सायकल व पिस्तोलसह अटक केली आहे. सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटर सायकल व ३० हजार पिस्तोल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत येथील पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी तालुक्यातील किनगाव येथील मुख्य रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीच्या समोर मध्य प्रदेशातील सिंगनुर पोस्ट बेहरामपूर जिल्हा खरगोन येथील गोलू सिंग दिलीप सिंग भाटिया वय २८ हा विनापरवाना गावठी बनावटीचे ३० हजार रुपये किमतीचे पिस्तोल जवळ बाळगताना आढळला त्याचे कडील होंडा कंपनीची विनाक्रमांकाची शाईन मोटर सायकल किंमत रुपये ४० हजार असा ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह संशयित आरोपी गोलू सिंग भाटिया यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक प्रमोद अरुण लाड वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात भादवी कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार विनोद खांडबहाले करीत आहेत