बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर
बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे यासाठी भोले महाकाल फाउंडेशन तर्फे माननीय तहसीलदार तहसील कार्यालय बोदवड यांना निवेदन दिले वरील संदर्भीय विषय आम्ही आपणास विनंती करीत आहोत की आपल्या तालुक्यातील 51 खेडे असून या सर्व लोकसंख्येचा ताण ग्रामीण रुग्णालयावर येत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील मर्यादित सुविधामुळे जनतेची मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या विषयी गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेता बोदवड ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण होण्याची तातडीने आवश्यकता आहे तरी या निवेदन द्वारे ही मागणी आम्ही आपणाकडे करीत आहोत अशा करीत आहोत की आपण आमची मागणी लवकरात लवकर शासन दरबारी पोहोचवावी सोबत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे , संघटन सचिव परेश शेळके, रवींद्र पाटील, सागर कुकडे , गणेश लोणारे उपस्थित होते…