Home Breaking News अनेक अपघात होऊन ,वेळोवेळी निवेदन देऊनही रस्ता जैसे थे शेवटी उपोषणाला बसताच...

अनेक अपघात होऊन ,वेळोवेळी निवेदन देऊनही रस्ता जैसे थे शेवटी उपोषणाला बसताच खासदारांसह बांधका विभागासह अधिकाऱ्यांनी भेट देत ,केली रस्त्याच्या कामाला सुरुवात ..!

454

 

यावल तालुका( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील दोन महत्वाच्या गुजरात आणी मध्य प्रदेश या राज्यांना जोडणारा अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राज्य मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दूरदशा झाली असल्याने या मार्गावरील रस्त्यावर अनेक वेळा अपघात होवुन निरपराध नागरीकांनी आपला जिव गमावले असुन , याविषयी वारंवार तालुकावाशी यांनी तक्रार करून ही सार्वजनिक बांधकाम विभाग यावलकडून रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात आपले उपोषणास सुरुवात केले होते. रविन्द्र पाटील यांचे उपोषण सुरू होताच , बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गांनी धावपळ करत, खडी टाकत या मार्गावरील कामास सुरुवात केली .दुपारी खासदार रक्षा खडसे यांनी उपोषण स्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाची झाडाझडती घेतली नागरिकांनी तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाने वेळीच दखल घेतली असती तर पदाधिकाऱ्यांवर उपोषणाची वेळ येणार नसल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले खडसे यांनी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेशही बांधकाम विभागात दिले आहेत खासदार खडसे यांनी उपोषणार्थी पाटील यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जे . एस. तडवी, अभियंता निंबाळकर, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे ,भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी , उज्जैनसिंग राजपूत , सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी , भाजपा युवा मोर्चाचे सागर कोळी व्यंकटेश बारी यांचे सह अनेक भाजपा पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Previous articleबोदवड ग्रामीण रुग्णालय विस्तार उप जिल्हा रुग्णालय करावा….भोले महाकाल फाऊंडेशन तर्फे निवेदन
Next articleभानखेडा येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या –