Home Breaking News Shiv senik/ शिव सैनिका ची रोज बुधवारला सायंकाळी ठीक पाच वाजता...

Shiv senik/ शिव सैनिका ची रोज बुधवारला सायंकाळी ठीक पाच वाजता हिंगणघाट शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक यांची संयुक्त बैठक सांम्पन

163

 

हिंगणघाट मलक नईम।

वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख मा. बाळाभाऊ राऊत तथा जिल्हाप्रमुख श्री. अनिल भाऊ देवतारे यांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे तथा वर्धा हिंगणघाट जिल्हा समन्वयक मा. श्री. डॉ. उमेश तुळसकर तथा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे व शहर प्रमुख सतीश ढोमणे यांच्या नेतृत्वात मातोश्री महिला महाविद्यालय ,नंदोरी रोड, हिंगणघाट येथे घेण्यात आली. बैठकीचे प्रमुख मुद्दे येणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता पक्षांचे ध्येय- धोरण,संघटन मजबूत करणे, निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात यावा व निवडणुकीची तयारी करणे या संदर्भात चर्चा करण्यात आली. —–बैठकीची सुरुवात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत प्रास्ताविक माजी नगरसेवक श्रीधर कोटकर यांनी मार्गदर्शन केले .त्यांनी बैठकीत शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आता सुरू असलेल्या राज्यात व देशात पक्षाच्या घडामोडी बद्दल सांगितले . इथे शिवसैनिक बैठकीला उपस्थित आहे ते सर्व निष्ठावान शिवसैनिकाची आहे .आपण शिवसेनेच्या जन्मा पासूनच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सध्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहो असे त्या ठिकाणी कळविले. त्यानंतर वैद्यकीय सेलचे डॉ. आदर्श गुजर यांनी बैठकीत शिवसैनिकांना नेतृत्वाबद्दल महत्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की आपले नेतृत्व आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आहेत. ते मजबूत आहे त्यामुळे आपल्याला न डगमगता येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन समोर जायचे आहे असे त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत हिंगणघाट तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सतीश धोबे यांनी पक्ष संघटन मजबुती करिता प्रत्येक वार्डात आपल्या ज्या शाखा आहे ते नूतनीकरण करून पुन्हा शाखा बांधणी करावी. तसेच वार्डात सभा -बैठका घेण्यात यावे असे सर्व शाखाप्रमुखांना निर्देश दिले. नगरपरिषद येथे भाजपा सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जसे अमृत योजनेचे पाणीपुरवठा योजना तथा मल्लनिसारण हे दोन्ही योजनेतील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे कसा नागरिकांना त्रास झाला आणि त्या त्रासाला आजही जनता भोगत आहे.या साठी स्थानिक आमदार व नगराध्यक्ष पूर्ण पणे जवाबदार, तसेच नगरपरिषदेतील भाजप सरकार हे पूर्णतः अपयशी ठरले. त्यांना नगर परिषद प्रशासनवर नियंत्रण नव्हते ठेवता आले नाही ,या दोघांनी मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला तो जनते समोर आना व वार्डातील जनतेला पटवून द्यावे.त्यांच्या पक्षातील नगरसेवक मनातून नाराज आहे काही त्यातील जास्तीतजास्त लोक आमच्या लोकांच्या संपर्कात आहे. शेवटी ते हि नगर सेवक आहे गडी नाही, त्यांना सुद्धा मानसम्मान आहे त्यांची सहन करण्याची शक्ती संपली असे दबल्या आवाजात ते बोलत आहे. तसेच महिला आघाडी, युवासेना तथा शिवसैनिक यांनी एकत्र येऊन घरोघरी जाऊन शिवसेनेचे महत्त्व पटवून देणे व त्यांना आपल्या पक्षाला नगर परिषद मध्ये संधी द्याल अशी विनंती करा.वार्डात घरोघरी शिवसैनिक तयार केले जावे. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी राज्य पातळीवर संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ सोबत युती केल्यामुळे आपले येथील संभाजी ब्रिगेडचे श्री राजूभाऊ धोटे व त्यांच्या पदाधिकारी सोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. ते सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. निवडणूक कालावधी मध्ये ते आपल्याला मदत करतील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री .राजेंद्र खूपसरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यांनी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका जसे नगरपरिषद, जिल्हा परिषद तथा पंचायत समिती या सर्व निवडणुकीकरिता शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व पक्ष मजबूत करण्याकरिता “गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक” ही संकल्पना राबवावी. तथा सरकारमध्ये असलेल्या देशात राज्यात व शहरात भाजपाने मागील आठ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा परिपाठ वाचला व हा परिपाठ जनतेपर्यंत पोहोचवावा असे कार्यकर्त्यांना सांगितले. भाजपाच्या सरकार मध्ये देशात महागाई ,बेरोजगारीचा मोठा प्रश्न जनतेसमोर येऊन ठाकला आहे . शासन प्रशासन कुठेही दिसत नाही त्यामुळे सर्वीकडे भाजप पासून जनता त्रस्त आहे. फक्त पुढे कोणी येऊन बोलत नाही शिवसेना या विरुद्ध बोलत असते. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सर्व शिवसेना, महिला आघाडी तथा युवासेना च्या पदाधिकारी व शिवसैनिकांना एक संघ राहण्याचे आवाहन केले. सभेकरिता प्रमुख शिवसेना पदाधिकारी म्हणून या वर्धा -हिंगणघाट जिल्ह्याचे समन्वयक मा. श्री. डॉ. उमेश तुळसकर यांनी सांगितले की हिंगणघाट येथे प्रत्येक पक्षाचे मेळावे झाले व त्या मेळाव्यात त्यांच्या त्यांच्या पक्षाचे मोठे नेते बोलाविले .तसेच आपण सुद्धा नगरपरिषद निवडणुकी करीता युवासेना प्रमुख मा. आमदार श्री .आदित्यजी ठाकरे साहेब ,यांना बोलावून घेवू असे आश्वासन शिवसैनिकांना केले. मी नगरपरिषद निवडणूक लढणार नाही असे त्यांनी घोषित केले. पक्षाचा सर्व निवडणूक यंत्रणे वर लक्ष ठेवून या नगरपरिषद वर जास्तीत जास्त सदस्य निवडून आणून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे कार्यकर्त्यांना आश्वासित केले.आपल्या पक्षाला मजबूत करणे व या शहर, तालुक्यातून भ्रष्टाचारी पक्षाला तडीपार केल्या शिवाय मि शांत बसणार नाही.तसेच बैठकीत महिला जिल्हा संघटिका सौ. संगीताताई कडू , शहर प्रमुख सतीश ढोमणे ,युवासेना जिल्हाधिकारी अभिनंदन मनोत, उपतालुकाप्रमुख प्रकाश अणासाने ,शहर संघटक मुन्ना त्रिवेदी, युवा सेनेचे शहर प्रमुख भूषण कापकर, माजी नगरसेवक मनीष जेवढे, निताताई धोबे, माधुरीताई खडसे ,मनोज वरघणे, भास्कर ठवरे,देवेंद्र पडोळे, नारायण जाधव,संगीताताई वाघमारे, प्राची प्रसापाचखेडे,नीलिमा शंकर मोहमारे, स्वाती संजय पिंपळकर,रजनीगंधा मोहन तुमराम,प्रियंका अविनाश धोटे,रेश्मा बाकरे,ज्योती रवी रंगारी,उपशहर प्रमुख गजानन काटोले,जयकुमार रोहनकार, संजय पिंपळकर, शंकर झाडे ,लक्ष्मण बकाने ,विभाग प्रमुख -रुपेश काटकर, मोहन तुमराम,अविनाश धोटे,सचिन मुडे, शाम सातपुते ,नितीन वैद्य, महेश खडसे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील आष्टीकर,सुरेश चौधरी,बंटी वाघमारे, दिनेश धोबे, अनिल लालटेंनवार,प्रकाश घोडे, मारुती अराडे,किशोर इंगोले, दिलीप चौधरी, प्रकाश भुसारी,प्रफुल क्षिरसागर,आशिष जैस्वाल, आशिष भांडे,भास्कर मानकर, अनंता गलांडे,मनोज मिसाळ, योगेश गोडमारे,विवेक भोयर,सुरेश किंनेकर, नरेश भजभूजे,मनोज जुमडे, हरदिप काळे,संदीप चावरे, चंदू भुते, देवा शेंडे,नरेश खुरपडे,गोपाल चौधरी,गौरव गडेकर,संतोष चौधरी,गजानन डोंगरे,रवींद्र काळे, मुरलीधर घाटे,विशाल नागापुरे, प्रकाश भोयर,सुरज रंगारी, नितीन तायडे,हिरामण आवारी,बलराज डेकाटे,निखिल झिबल,पप्पू इटनकर,

 

Shiv senik

Previous articleHindi divas/स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेने ‘हिंदी दिवस’ साजरा केला।
Next articleLampi/लम्पी आजाराची लस उपलब्ध करून, मोफत लसीकरण मोहीम राबवावी-हर्षल फदाट(बापू) ना.राधाकृष्ण विखे पाटील (पशुसंवर्धनमंत्री )यांच्याकडे हर्षल फदाट पाटील यांची मागणी