आपलं गावचं नाही का तिर्थ। बाबा रिकामा कशाला फिरतं।।
आपल्या गावची शाळा मोडली।
धर्मशाळा तीर्थाशी बांधली ही जानच नाही का व्यर्थ।।
या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता ओवीला समजून घेऊन. आपल्या गावातील शाळेला कसं उन्नतीकडे नेता येईल किंवा तिचा दर्जा कसा उंचावता येईल यावर काम करण्याचा विचार ग्रामपंचायत मध्ये आम्ही केला. आणि तो विचार करण्यासाठी सर्व दोन्ही पॅनलच्या सदस्यांनी त्यावर संमती दर्शवली.

आणि मग शाळेवर काम करण्यास ठरवलं,कारण गावातील शाळा ही का जर सर्व बाबतीत समृद्ध झाली तर गावातील शाळेच्या शिक्षणा दर्जा उंचावतो आणि त्यात शिक्षण घेणारे मुले आणि त्यातही जर त्या मुलांना चांगल्या वातावरण शिक्षण मिळालं तर त्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे शिक्षणात लागलेलं मन आणि अशा प्रसन्न वातावरणात घेतलेले शिक्षण निश्चितच मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीचा एक भाग असू शकतो. आणि अशा प्रसन्न वातावरणात आणि सर्व सुख सोयी असल्यावर शिकवण हे त्या शाळेतील शिक्षकांसाठी सुद्धा सोयीचं होतं. आणि म्हणून च *ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगातून शाळेला सोलर पॅनल, मुलांना शूज उच्च प्रतीच्या स्कूल बॅग आणि सुंदर असं आय कार्ड* वाटण्याचा मानस आमचा होता. आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व मंडळींच्या मदतीने पूर्णत्वास पण नेला. आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी *शाळा पळशी झाशी येथे शिकत असलेल्या 258* विद्यार्थ्यांना आम्ही या साहित्याचे वाटप केले. आणि या जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या मुलांना खाजगी संस्था सारख्याच दर्जेदार वातावरण कसे मिळेल किंवा त्यापेक्षाही चांगलं वातावरण कसे निर्माण करता येईल. या अनुषंगाने त्या मुलांची काळजी घेण्याचे काम आम्ही करत आहोत.आणि मला वाटते सर्व सरपंच बांधवांनी गावातील जिल्हा परिषद शाळेचे उदात्तीकरण करून त्यात सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आपल्या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली निश्चितच चांगले शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक प्रगती साधतील यात तीळ मात्र शंका नाही.
मला यात साथ देण्याऱ्या आमच्या उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या गावची शाळा
आपला स्वाभिमान.