(तुकाराम राठोड,जालना)
प्रतिनिधी:(जालना)माझ्या जिवाभावाच्या मित्रांनो आज महाराष्ट्रात सुशिक्षित रोजगाराच्या संदर्भाने बघितले तर,महाराष्ट्रात प्रती वर्ष माहीती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडतात.
त्या हाताला योग्य वेळेत पाहीजे ते काम निर्माण करून देण्याचे काम इथल्या सरकारचे आहे.पण आज आपण पहातो लाखो सुशिक्षित तरूण हे बेरोजगार आहे.
खऱ्या अर्थाने वेदांत आणि फाॅक्सकाॅन या उद्योगामुळे महाराष्ट्रातील तब्बल एक लाखापर्यंत तरूणाच्या हाताला काम मिळाले असते.ज्या अपेक्षा घेऊन आज मुलांचे आई-वडील मुलांना शिकवतात त्या अपेक्षा मुलाकडून शिकल्यानंतर कामा आभावी पूर्ण होत नाही.त्यामुळे तरूण हा मनात तणावाखाली वावरत असतो.मोठ-मोठ्या उद्योगात काम करणारे तरूण मुले हे आमदार-खासदारांची नसतात,तर सर्व सामान्य परस्थितीतील आसतात,आडाणी शेतकर्यांची आसतात.याचे नेहमी राजकीय नेतृत्ववाने भान ठेवायला हवे.
वेदांत आणि फॉक्स कॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास राजकीय ईच्छाशक्ती कारणीभूत आहे.आज महाराष्ट्रातील शेतकरी हा दिवसेंदिवस नैसर्गिक संकटात सापडत आहे.महागाई गगनाला भिडली.शुसिक्षित तरूण बेरोजगार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही.आशा अनेक अडचणीत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आणि राजकीय मंडळीना आशा गोष्टीचे गाभिर्य हारपलेले दिसते,हे राजकारणी अधिवेशनात धक्काबुक्की करतांना आपल्याला पहायला मिळाले आहे.यासाठी यांना जनतेने निवडून दिले आहे का? राजकारण हे वयक्तीक हेवे -दाव्यावर आलय.यांना याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.
आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे की,उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी या गोष्टीचा सारासार विचार करण्याची गरज आहे.
व्याख्याते,कृष्णा गाडेकर
मो.7350773253
Jalna:-Kishan