यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
यावल तालुक्यात विविध ठिकाणी सदगुरू मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पीटल अॅण्ड मेडीकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्र्वर जिल्हा नाशिक प्रणित स्वामी समर्थ सेवा केन्द्र ( दिंडोरी प्रणीत ) यावल यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुक्यातील रोज मोफत आरोग्य तपासणीव नाडी परिक्षण शिबीरास सुरूवात झाली असून या शिबीरांना नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे . माधवनगर टेलिफोन ऑफिस भुसावळ रोड यावल येथे
स्वामी समर्थ केंद्र येथे तपासणी शिबीराची सुरूवात दीप प्रज्वलन करून माजी नगरसेवक उमेश फेगडे व केंद्राचे प्रमुख व सेवेकरी यांनी केले या शिबिरास विविध आजारांवर साडेपाचशे (550) नागरिकांनी सहभाग नोंदवला नाडी परीक्षण करून तज्ञांनी मार्गदर्शन व औषधी उपचार केले.

तसेच , तसेच दिनांक १२ सप्टेंबर किनगाव येथील कौशल्यदास महाराज मठ येथे , दिनांक १३ सप्टेंबर रोजी दहिगाव तालुका यावल येथील श्री मारोती मंदीर, दिनांक १४ सप्टेंबर रोजी डोंगर कठोरा येथे मंदीरात , शिबिर पार पडले येथेही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला
दिनांक १६ सप्टेंबर रोजी भालोद येथील पंचवटी मंदीर तर दिनांक १७ सप्टेंबर रोजी सांगवी येथे श्री स्वामी समर्थ केन्द्र ,भास्कर नगर या ठिकाणी आयोजीत करण्यात आले असुन, या आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार, मधुमेह , ब्लडप्रेशर, कावीळ , पोटाचे विकार , अॅनिमिया,संधीवात , मनोविकार , मुतखडा , स्त्रियांचे आजार , त्वचा विकार , मुळ्व्याध, लहान मुलांचे आजार , कॅन्सर आदी आजारांवर मोफत उपचार केले जात आहे . अजून काही दिवस हे शिबिर तालुक्यात विविध ठिकाणी चालू आहे
या संधीचा तालुक्यातील सेवेकरी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केन्द्र ( दिंडोरी प्रणीत ) यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे .
Jalgaon-Yaval