Home Breaking News जामठी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी जातीने लक्ष...

जामठी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी जातीने लक्ष देत पशु वर येणाऱ्या लम्पी स्किन आजारावरती उपचार करून पशू सेवा हीच ईश्वर सेवा 

337

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील जामठी येथे
पशुपालक शेतकऱ्यांना लम्पी स्कीन आजाराला घाबरू नका राज्यसह जिल्ह्यातही जनावरांना होणाऱ्या लम्पी स्कीन या आजाराने थैमान घातले आहे मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही गुरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय डॉक्टर सूरज बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी शेतकऱ्यांना माहिती देत सांगितले की लम्पी स्कीन हा विषाणू आजार आहे हा हजार देवी विषाणू गटातील गोट फ्रॉक्स लसीकरण प्रवर्गातील झालेले आहे हा संसर्गजन्य आजार असून याचा प्रचार चावणाऱ्या माशा गोचीड चिलटे बाधित जनावरांना स्पर्श दूषित पाणी चारा यामुळे होतो जनावरांच्या अंगावर दहा ते पन्नास मीमी व्यासाच्या गाठी तयार होतात सुरुवातीला जनावरांना भरपूर ताप येतो डोळे नाकातून चिकटसर सर्व्ह बाहेर येतो जनावरे पाणी कमी पितात पिने बंद करतात दूध उत्पादन घटते काही गुरांच्या पायावर सूज येऊन ते लघंळतात पशुपालकांनी गोठ्यात डास माशा गोचीड होणार नाहीत याची काळजी घ्यावी जनावरांवर उपचार करताना नवीन सूयांचा वापर करावा बाहेर व्यक्ती किंवा डॉक्टर गोठ्यात येत असल्यास त्या आधी गोट्याचे निर्जंतुकीकरण करावे आजार सुरू असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री थांबवावी बाधित गुरांचा ताबडतोब इतर गुरांपासून वेगळं ठेवावे गोठ्यात सोडियम आयपो क्लोराईड फवारणी करावी तसेच पशु सेवा यांची सेवा आहे तत्पर सेवा करू तरीही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना टेटमेंट करुन घ्या पशुपालक यांना डॉक्टर यांनी सर्वांना माहिती दिली व
जामठी गावामधील गुरांची तपासणी करण्यात आली सर्व पशु पालक यांना डॉक्टरांनी सगीतल्या प्रमाणे गुरांवर कसे उपचार करावा समजून घेतले त्या वेळेस उपस्थित

उपरोक्त संदर्भीय विषयां न्वये सध्यस्थितीत राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यामध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे सदर साथ रोगाचा फैलाव तीव्रतेने वाढत आहे यासाठी पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण यंत्रणा लसीकरण व पशुधन उपचाराचे काम करीत आहे

सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे दुदैवाने पशुधन मयत झाल्यास पंचायत समिती स्तरावरील बांधकाम विभागाचे मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे कामे जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन पशुधन विकास अधिकारी यांचे उपस्थितीत व सहकार्याने 8 फूट लांब 4 फूट रुंद व 7 फूट खोल खड्डा करावा

 

तसेच उपस्थित असलेले पशुपालक यांना माहिती देण्यात आली
देविदास पाटील संजय तायडे, ,गोविंदा दादा शेळके, विजय सिंग पाटील, विशाल ठाकूर,गजानन गुरव ,देवराम मालकर,नितीन मालकर ,कैलाश पाटील ,जितेंद्र पारधी वार्ताहर, ,सतिष पाटील ईश्वर वाणी G9 न्युज वार्ताहार, सुधाकर घ्यार ,

Previous articleBuldhana /शेगांव पुनर्वसन बाधितांसाठी गाठलं राजभवन
Next articleबोदवड येथे संभाजी ब्रिगेड तर्फे ‘ लोक प्रबोधन दिन ‘ साजरा