Home Breaking News बोदवड येथे संभाजी ब्रिगेड तर्फे ‘ लोक प्रबोधन दिन ‘ साजरा

बोदवड येथे संभाजी ब्रिगेड तर्फे ‘ लोक प्रबोधन दिन ‘ साजरा

246

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर-

बोदवड येथे प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस ‘लोक प्रबोधन दिन’ म्हणून संभाजी ब्रिगेड तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात बोलतांना सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी प्रबोधनामुळे माणसाची वैचारीक प्रगल्भता वाढते व बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टीकोन निर्माण होतो. समाजात एक समतेची ,मानवतेची भावना निर्माण करते. असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान फार मोठे आहे. १६ आक्टोंबर १९२१ पासून सुरु केलेल्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी जी सामाजिक जागृती करण्यास सुरवात केली त्याचा प्रभाव जनमानसावर पडला होता.त्या मुळे त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखले जाऊ लागले.अंधश्रद्धा ,अनिष्ट रूढी, परंपरा, याचे विरुद्ध जनजागृती निर्माण करणे. या सारखे विचार प्रस्थापितांच्या विरोधास न जुमानता धाडसाने मांडले .आपल्या लेखनास व वैशिष्टपूर्ण वक्तृत्वास इतिहास संशोधनाची ते जोड देत असत. आज हा लोकप्रबोधन दिन साजरा होत आहे, या उपक्रमामुळे आजच्या काळात प्रबोधनाची समाजास जी फार गरज आहे त्याचे महत्व समजून घेत नवीन पिढीस प्रबोधनात्मक विचार, वाचणे, ऐकणे व त्यावर चिंतन करून सुजाण नागरिक होण्यास मदत मिळेल हे आपल्या मनोगतात व्यक्त होत पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याचा परिचय थोडक्यात उपस्थितांसमोर मांडला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष अंनता वाघ, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष विलास सटाले,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले ,तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार, सचिव वैभव गांवडे ,शहर अध्यक्ष शैलेश वराडे ,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष दिपक खराटे ,संघटक गणेश सोनवणे, माजी अध्यक्ष गणेश पाटील , चिखली चे उपसंरपच रामलाल ढगे ,धनराज पाटील ,गणेश मुलाडे, हेमंत चौधरी ,सोपान महाले, तालुक्यातील शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleजामठी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी जातीने लक्ष देत पशु वर येणाऱ्या लम्पी स्किन आजारावरती उपचार करून पशू सेवा हीच ईश्वर सेवा 
Next articleलम्पी ग्रस्त गुराची विनामूल्य सेवा करणार्या डाॅक्टर गजानन चौधरी चा बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यानी केला सत्कार पशु सेवा हीच ईश्वर सेवा