Home Breaking News Jalna /सावंगी तलाव येथे २०० जनावरांना देण्यात आली लंम्पची मोफत लस:

Jalna /सावंगी तलाव येथे २०० जनावरांना देण्यात आली लंम्पची मोफत लस:

347

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथे २०० जनावरांना देण्यात आली लंम्पची मोफत लस.जालना जिल्ह्यामध्ये या चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये जनावरांना मोफत लसीकरण शिबिर आयोजित करावा असा आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला होता,त्याच अनुषंगाने मानेगाव पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत जालना तालुक्यातील गावोगावी जाऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यां मार्फत मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.त्याच आधारे आज रविवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सावंगी तलाव येथे मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम राठोड,अनिल राठोड तसेच ग्रामपंचायत सावंगी तलाव येथील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Previous articleशहर आनी परिसर मधे हाडपक्या गणेश उत्सव परंपरा पूर्ण वातावरणात साजरा.
Next articleवाघीण व दोन पिल्लांची दहशत परिसरात 3 जनावर जखमी तर 1 ठार