विठ्ठल अवताडे बुलढाणा प्रतिनिधी
शेगाव शहरातील मध्यंम वर्गीय कुटुंबात असणारी शेरयू देशमुख शिक्षणात आणि अभ्यासात नेहमीच खूप हुशार होती तिने अकोला येथे पुढील शिक्षण घेत असताना आताच झालेल्या सी ई टी मध्ये फिजिक्स ,केमेस्ट्री ,आणि मॅथेमॅटीक्स मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम स्थान मिळवले आहे ,या यशामुळे शेगाव शहराच्या शिरेपेचात मनाचा तुरा खोवला आहे , तिच्या यशाचे श्रेय तिने आई वडील शिक्षकांना दिले ,तर स्वतः मेहनत करत आपण मनात जिद्द ठेऊन धेयाच्या दिशेने परिस्थितीची जाणीव ठेऊन वाटचाल करत पुढे गेलो तर यशसवी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही ,पाहिजे असते धेय्य आणि त्यासाठी जिद्द मग यश आपोआप मिळत असेते ,तर मी ही आठ तास अभ्यास करत होते सोबतच नेहमी मला माझे ध्येय डोळ्यासमोर दिसत असल्या मुळे येवढे मोठे यश मला सहज मिळवता आले असे तिने बोलताना सांगितले तर आई वडील शिक्षक नातेवाईक मित्रमैत्रिणी तथा अनेक सामाजिक वेक्तीनी तिचे कौतुक केले असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती आदर्श ठरली आहे आज सर्वत्र तिचे कौतुक होत आहे यावेळी संभाजी ब्रिगेड शेगाव वतीने तसेच नागरिकांनी सत्कार केला यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे , ज्ञानेश्वर निंबाळकर , सुधीर पोरे , महेश गावंडे ,उमेश अवचार , आकाश पवार सह इतर नागरिक उपस्थित होते