जिल्हा प्रतिनिधी-सतिष बावस्कर
बोदवड तालुक्यातील लंपीग्रस्त गावात १८ आक्टोंबर रोजी डाॅ समीर बोरकर उपायुक्त पशुसंवर्धन पुणे, डाॅ श्री सतिष चौधरी सहाय्यक आयुक्त पुणे ,डाॅ सदाशिव सिसोदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जळगाव येथे संपूर्ण दिवस थांबून लंपी बाधित पशूंची गावोगावी जाऊन पाहणी तसेच मोफत उपचार व मार्गदर्शन केले.पशुपालकांशी संवाद साधुन योग्य त्या उपचारा बाबत पशुपालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व लंपी बाधित पशूंना मोफत औषधसाठा उपलब्ध करून दिला.तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी व खाजगी पशुचिकित्सक यांना उपचाराबाबत व खबरदारीच्या उपाय योजनांबाबत सुचना दिल्यात.सर्व बाधित पशूंना पुरेसा औषधसाठा जि.प.जळगाव मार्फत उपलब्ध करून दिला.बाधित पशुंना उपचारासाठी खाजगी पर्यवेक्षकांना शासकीय यंत्रणेच्या सोबत उपचार करणेबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांना सोबत घेऊन पथक निर्माण केले .गेल्या महीनाभरापासून तालुक्यातील ६ खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांनी लंपी नियंत्रणाकामी लसीकरण,औषधोपचारासाठी योगदान दिलेले आहे व यापुढेही आजार पूर्ण नियंत्रणात येईपावेतो सहकार्याची तयारी दाखवली.
गेल्यामहीनाभरापासून खाजगी पशुधन पर्यवेक्षक तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील व त्यांचे सहकारी शासकीय यंत्रणेच्यामार्गदर्नाखाली दिवसरात्र सेवा देत आहेत.त्याबद्दल मा.डाॅ बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौतुक करत धन्यवाद दिले.
यावेळी डाॅ जाधव रामदास, जळगाव, डाॅ साखरे बोदवड, खाजगी पशुधन पर्यवेक्षक संघटना तालुका अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, श्री.सुरज पाटील हे उपस्थित होते.दरम्यान आदल्या दिवशी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर
लंपी नियंत्रणाकामी मोफत लस व औषधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.