प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत इयत्ता आठवीवर्गातील मानव विकास अंतर्गत मुलींना सायकल वाटप शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.परमेश्वर गरबडे साहेब व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे साहेब व शाळेचे मुक्याध्यापक सी.जी.वाघमारे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलींना पालकांच्या सोबत सायकल वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांनी यावेळी माहीती दिली की ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी,मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण कमी करणे,यासाठी मानव विकास मिशनने गाव ते शाळा या दरम्यान सर्व मुलींना मोफत सायकलींचे सोय उपलब्ध केली यावेळी उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरीक व गावकरी,पालक व शाळेचे विद्यार्थी व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होती… श्रीमती.एस.आर.कुलकर्णी.,वाय.बी.मदन.,डी.एन.सोनकांबळे.,पी.पी.नागरे.,श्रीमती.ए.बी.देशपांडे.एल.बी.जाधव.,आर.एस.ठाकरे.एस.बी.राऊत.,एम.ए.खरात आदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे सहशिक्षीका श्रीमती.ए.बी.देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक वाय.बी.मदन संयोजन केले