Home Breaking News मालोद ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी शिवसेनाच्या रमाबाई बारेला तर परसाडे सरपंचपदी अपक्ष मीना...

मालोद ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी शिवसेनाच्या रमाबाई बारेला तर परसाडे सरपंचपदी अपक्ष मीना तडवी विजयी

667

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी क्षेत्रातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतच्या झालेल्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाचे निकाल आज जाहीर झाला असुन, यात ग्रामपंचायत सदस्य निवड व लोकनियुक्त सरपंच पदासाठीच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय ईमारतीत शांततेत पार पडली . या निवडणुकीत मालोद ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाच्या रमाबाई भारसिंग बारेला ह्या विजयी झाल्या असून, परसाडे तालुका यावल येथील लक्ष वेधणाऱ्या ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत सरपंचपदी माजी पंचायत समितीच्या सदस्य मीना राजू तडवी ह्या विजयी झाल्या आहेत.

यावल तालुक्यातील मालोद येथील सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकनियुक्त सरपंच, पदासह एकुण१३ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणी विजयी झाले आहे यात रमाबाई भारसिंग बारेला यांनी ७१२ मते मिळवून विजय मिळविला त्यांनी मयमुदाबाई बिस्मिल्ला तडवी यांचा ७५ मतांनी पराभव केला महमुदाबाई यांना ६३७ मते मिळाली आहेत. मालोद ग्रामपंचायत सदस्य पदी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १– दशरथ रमजान तडवी (१८३) ,परवीन भिकारी तडवी (३३१), प्रभाग क्रमांक २– पियया रुलसिंग बारेला (१७७),नजमा हमीद तडवी बिनविरोध , प्रभाग क्रमांक ३– , सुंदर सिंग गुलाब बारेला (४४५), सैनाज शरीफ तडवी (२५५), उर्मिला अनिल बारेला (४२४), प्रभाग क्रमांक ४– सलीम अकबर तडवी (९९), आबेदा सिकंदर तडवी (१५९), शकीला रणजीत बारेला (१४५), प्रभाग क्रमांक पाच जहागीर शेरखा तडवी ( ४८३) , भिका निजाम तडवी (३८५), मुन्नी जुम्मा तडवी (३५९), हे विजयी झाले आहेत

तालुक्यातील परसाडे येथील मीना राजू तडवी यांनी माजी सरपंच नजमा मजीद तडवी यांचा अटीतटीच्या निवडणुकीत अवघ्या १२ मतांनी पराभव केला आहे .मीना तडवी यांना ५३४ तर पराभुत माजी सरपंच यांना नजमा तडवी यांना ५२२ मते मिळाली आहेत. परसाडे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेले सदस्य व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक १– बाबासाहेब शंकर भालेराव (१७४), रमजान शंभू तडवी (१६३), खल्लोबाई युनूस तडवी (१६२) , प्रभाग क्रमांक २– सुलेमान काना तडवी (१९६), मुन्नाभाई इस्माईल तडवी (१९२), योगिता सतीश सावळे (१९५) प्रभाग क्रमांक तीन रोशन सुभान तडवी (२१२) , शकीला महमूद तडवी (१४५), मदिना सुभेदार तडवी(२२८), मते मिळाली आहे.
विजय उमेदवार झाल्यानंतर समर्थकांनी जोरदार , जल्लोष केला आहे मालोद येथील नवनिर्वाचित सरपंच रमाबाई बारेला यांच्या विजया नंतर येथील बाजार समिती समोर शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
तहसीलदार महेश पवार निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार आर डी पाटील, घरसाडे ग्रामपंचायतच्या निवडणुक अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी शेखर तडवीतर मालोद ग्रामपंचायत निवडणुक अधिकारी म्हणुन किनगावचे मंडळ अधिकारी सुधाकर पाटील यांचे नियंत्रणा खाली महसुल प्रशासनाच्या वतीने मतमोजणी सुरळीत पार पडली तर पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, फौजदार सुनीता कोळपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतमोजणी ठीकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleहिंगणघाट शहरात देशी कट्टा विक्री प्रकरणात गुन्हे प्रगटीकरण पथकाची कारवाई
Next articleBuldhana/संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या तालुका प्रमुख पदी अमोल ठाकरे यांची नियुक्ती