Home Breaking News ठाण्याचा पोपट काय म्हणतो वेदांत प्रकल्प गुजरातला नेतो, सह पन्नास खोके एकदम...

ठाण्याचा पोपट काय म्हणतो वेदांत प्रकल्प गुजरातला नेतो, सह पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणेत सरकार विरोधी आंदोलन

366

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि

स्थानिक शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्या ,म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्या घेऊन रस्ता रोको करत धरणे आंदोलन करण्यात आले ,यावेळी शेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० मदत द्या ,वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा वापस आणावा , संजय गांधी योजनेतील २५ वर्षाच्या मुलांची अट रद्द करण्यात यावी , PM किसन योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात त्वरित जमा करावा , जीवनावश्यक वस्तूं वरील भाव कमी करून GST कमी करावी असे मुद्दे घेऊन आज हे आंदोलन करण्यात आले , शेकडो कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून आपला रोष व्हेक्त करण्यात आला तर यावेळी तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे , शहर अध्यक्ष दिनेश साळुंके ,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, माजी शहर अध्यक्ष मनोज शर्मा , नितीन कराळे , यांच्या सह सर्वच पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते आणि परिसरातील शेकरी उपस्थित होते

Previous articleप्रलय तेलंग यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
Next articleअमृत महोत्सवा निमित्य ‘सर्वासाठी घरे अंमलबजावणी करा-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे