Home Breaking News पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तरीसुद्धा शिस्तीच्या नावाखाली यावल पोलिसाकडून वार्ताहरास...

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तरीसुद्धा शिस्तीच्या नावाखाली यावल पोलिसाकडून वार्ताहरास धमकी,

801

 

पोलीसकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न यावल येथे काल तहसील कार्यालय मध्ये पोलीस कडून पत्रकाराला धमकी

यावल तालुका (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शिस्तीच्या नावाखाली यावल पोलिसाकडून वार्ताहरास धमकी,
यावल : येथील तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता तेव्हा वृत्त संकलन करण्यासाठी तहसील कार्यात जाणाऱ्या वार्ताहरास पोलिसांनी अडवले व पोलिस निरिक्षकांना तहसिलदारांकडून परवानगी बाबत बोलणे करीत वार्ताहरास सोडले मात्र, पुढे पुन्हा पोलीस उपनिरीक्षक यांनी पुन्हा तुम्ही आत आलेच कसे ? असा प्रश्न निर्माण केला तेव्हा पोलिस निरिक्षकांनी खरचं तुम्हाला आत सोडले का ? याची खातर जमा करण्यासाठी त्यांनी एका कर्मचाऱ्याला सांगितले असता सदर कर्मचाऱ्यांनी तुम्ही आत्ताच खरं काय ते सांगा साहेबांनी नाही सांगितले तर तुम्हाला महाग पडेल असे सांगून शिस्तीच्या नावाखाली थेट धमकीच दिली. यामुळे पोलीस प्रशासनाच्या या वागणुकीचा पत्रकारांच्या वतीने निषेध केला जात आहे.
यावल तहसील कार्यालयात मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतचा निकाल होता सोमवारी वृत्त संकलन करण्यासाठी दिव्य मराठीचे प्रतिनिधी शेखरभाऊ पटेल हे जात होते तेव्हा गेटवरच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले व साहेबांना विचारल्याशिवाय तुम्ही आज जाऊ शकत नाही असे सांगितले. तेव्हा तिथे थांबून पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे थेट तहसीलदार महेश पवार यांच्या सोबत बोलणं आत प्रवेश देण्यात आला व थोडं आत गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा तुम्ही आत आलेच कसे ? असा प्रश्न उपस्थित केला व त्यांना सांगितले की पोलीस निरीक्षकांनी तहसीलदारांशी बोलणे केल्यावर आत सोडले आहे मात्र, त्यांनी खात्री करण्यासाठी एका कर्मचाऱ्याला सांगितले की पोलीस निरीक्षक यांना विचारून या की खरचं त्यांनी सोडलं आहे का ? तेव्हा सदर कर्मचारी जाण्याच्या आधी म्हणाला की आताच खरं काय ते सांगा साहेबांनी नाही सांगितलं तर तुम्हाला खूप महाग पडेल . तेव्हा एकूणच वृत्त संकलनाच काम करत असतांना पोलिसांच्या वतीने अशा पद्धतीच्या वागणुकीचा पत्रकारांनी निषेध केला आहे

Previous articleअमृत महोत्सवा निमित्य ‘सर्वासाठी घरे अंमलबजावणी करा-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
Next articleहिंगणघाट तालुक्यातील अतिवृष्टिमुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीचे सर्वेक्षाकरुन पात्र शेतकऱ्यांना अनुदान दयावे