प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील सावंगी तलाव येथे नवरात्र उत्सव निमित्त पायी ज्योत आणण्यासाठी आई तुळजाभवानी ग्रुप सावंगी तलाव येथील नागरिक हे दि.२०सप्टेंबर 2022 रोजी तुळजापूर कडे रवाना झाले आहे.ही परंपरा मागील आठ वर्षापासून अविरतपणे चालू असून,आता हे नव वर्ष आहे.गावातील सर्व जाती धर्मातील भक्तगण ज्योत आणण्यासाठी स्वखर्चातून,मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने तुळजापूरकडे जातात.आई तुळजाभवानी येथून ज्योत आणण्यासाठी-विठ्ठल जाधव,सोपान कळकुंबे,शिवाजी झोरे,संतोष राठोड,उत्तम शेजुळ, भगवान डिखुळे,रंगनाथ शेजुळ, संदीप खराडे,प्रदीप हरकळ, अनिल राठोड सह अनेक जण तुळजापूरकडे गेले आहे.