प्रतिनिधी:(जालना)अनिल मिसाळ यांनी सांगितले की,काल माझ्या नोकरीच्या कामानिमित्त मी आणि माझी बायको मुंबईला तिकीट बुक करण्यासाठी जालना स्टेशनला गेलो होतो.मी स्टेशन कडे जात असताना मला कपिल दहेकर सर दिसले.मी माझ्या पत्नीला म्हणाले की,बोल की ते कपील दहेकर सर ओबीसी चे भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष आहेत.मी म्हणालो पत्नीला बोल की आपली अडचण,सरांना सांगा आपली कैफियत.तेव्हा मी लगेच दहेकर सर कडे गेलो.आणि माझा परिचय दिला.व माझी सर्व हकीकत कामगार विभाग येथे 6 महिने अगोदर नोकरीला होतो. काही कारणवस्त मला नोकरीहून कमी करण्यात आले आहे.मी घरात मोठा असल्याने माझ्यावर आई-वडिलांची माझ्या पत्नीची सर्वांची जबाबदारी आहे.मुंबईतील अधिकाऱ्यांनकडे वारंवार मी चकरा मारूनही मला रुजू करून घेत नाही.कामावर परत घेत नाही.आणि आताही मुंबईचीच मी वारी करण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी आलो होतो.तेव्हा आपण मला दिसला,आपण मला काही मदत केली तर बरे होईल.सरांनी तात्काळ सदर अधिकाऱ्यांचा नंबर माझ्याकडून मागून घेतला. आणि अधिकाऱ्यांना विनंती केली व सरांची ही विनंती अधिकाऱ्यांनी मान्य केली.आणि सांगितले की मुंबईला अनिल ला पाठवू नका.मी उद्या फॅक्स द्वारे पुन्हा नोकरीवर परत घेण्याचा आदेश फॅक्स करून पाठवून देतो.मग सरांनी मला सांगितलं की,तुला मुंबईला जायची गरज नाही.उद्या तुला तू कामावर जा, तुला नोकरीला परत घेण्याचा उद्या आदेश येऊन जाईल.आणि या आनंदाने क्षणात डोळ्यात पाणी आले.असे होऊ शकते का? ते झाले मी लॉऊस स्पीकर मोठा करून,सरांनी मला ते ऐकवलं आणि विश्वास बसत नव्हता. पण तसे झाले होते.मी आणि माझ्या पत्नी ने सरांचे खूप-खूप आभार मानले.यापुढे अशा काही अडचण आल्या तर मला सांगा असे कपिल दहीकर सरांनी मला सांगितले आहे. तसेच सरांना अशाच त्यांच्या सामाजिक,राजकीय कार्याला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा.देव त्यांना अशा सामाजिक कार्य करण्याची ताकद देवो हीच सदिच्छा.अशी भावना अनिल मिसाळ,रा.मांडवा,तालुका,बदनापूर,जिल्हा जालना यांनी आपल्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.